आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारताचा GDP 9.6% ने घसरला

आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारताचा GDP 9.6% ने घसरला.

 • जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया आर्थिक फोकसच्या अंदाजानुसार भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 9.6% ने घसारा होणे अपेक्षित आहे.
 • COVID – 19 मुळे सर्वसामान्यांच्या व कंपन्यांच्या उत्पन्नात राष्ट्रीय लॉकडाऊनने घट झाल्याने हा अंदाज वर्तविला आहे.
 • दक्षिण आशिया प्रदेशाच्या उत्पन्नात 2020 मध्ये 7.7% ने घट होणे अपेक्षित आहे.
 • आर्थिक वर्ष 2022 मध्ये मात्र भारताच्या GDP मध्ये 5.4%ने पुनर्वाढ अपेक्षित आहे. कारण COVID – 19 मुळे लावलेली सर्व बंधने 2022 पर्यंत काढून टाकण्यात येतील. व त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था परत सुरळीत चालू होईल.

जागतिक बँकेकडून आर्थिक मदत – 

 1. जागतिक बँकेकडून सुमारे 100 देशांतील गरीब, असुरक्षितांच्या रक्षणासाठी, मानवी भांडवल तयार करण्यास, व अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्यासाठी 15 महिन्यांसाठी 160 अब्ज अमेरिकन डॉलर्सची तरतूद करण्यात आली.
 2. यामध्येच आंतरराष्ट्रीय विकास संघटना (IDA) अंतर्गत 50 अब्ज डॉलर्सचे अनुदान व अधिक सवलतीच्या कर्जांचाही समावेश आहे.

-स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ECOWRAP अहवालात आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारताच्या वास्तविक GDP मध्ये 10.9% ने घट वर्तविली आहे.

आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाही सर्वेक्षणानुसार (एप्रिल-जून) झालेल्या 23.9% च्या घसाऱ्याने येत्या सर्व quarters मध्ये वास्तविक GDP मध्ये घटच दिसून येईल.

-यापूर्वी जागतिक बँकेने जून 2020 मध्ये भारताच्या आर्थिक वाढीमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 3.2% घट होण्याचा अंदाज केला होता.

-तसेच भारताच्या राजकोषीय तुटीमध्ये 12% पेक्षा जास्त वाढ होईल. मात्र चालू खात्यावर GDP च्या 0.7% शेष राहण्याचे वर्तविले आहे.

जागतिक बँक

 • मुख्यालय – वॉशिंग्टन D.C.
 • अध्यक्ष – डेव्हिड रॉबर्ट
 • सदस्य राष्ट्र संख्या – 189
 • अहवाल प्रकाशित करते –
  1. World Development Report.
  2. Global Economic Prospects
  3. Ease of Doing Business.

Contact Us

  Enquire Now