आरबीआयचा चलनविषयक धोरण अहवाल जाहीर

आरबीआयचा चलनविषयक धोरण अहवाल जाहीर

 • भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०२१ या महिन्यासाठी चलनविषयक धोरण अहवाल जारी केला आहे.
 • या धोरणातही आरबीआयने कोणत्याही दरात बदल न करता आपली अनुकूल भूमिका कायम ठेवली आहे.

नवीन चलनविषय धोरणानुसार आरबीआयचे विविध दर:

अ) रेपो दर – ४%

ब) रिव्हर्स रेपो दर – ३.३५%

क) सीमांत स्थायी सुविधा दर – ४.२५%

ड) बँक दर – ४.२५%

जीडीपी अंदाज

 • वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) २०२१-२२ साठी ९.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आली आहे.

चलनवाढ

 • आरबीआयने ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) आधारे चलनवाढीचा दर ५.३ टक्क्यांवर निश्चित केला आहे.

आरबीआयची अनुकूल भूमिका

 • जोवर अर्थव्यवस्थेत शाश्वत सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेने अनुकूल भूमिका सुरू ठेवण्याचा तयार आहे.
 • याचाच अर्थ मौद्रिक धोरण समिती हे दर एकतर कमी करू शकते किंवा ते अपरिवर्तनीय ठेवू शकते.

महत्त्व

 • आरबीआयने हे दर कमी केल्यास कर्जे स्वस्त होतात परिणामी उद्योजक व्यावसायिकांची गुंतवणूक वाढते, आर्थिक व्यवहार, रोजगार, किंमती यात वाढ होते आणि पैशाला मागणी येऊन पतचलन विस्तार घडून येतो.
 • चलनघटीच्या काळात आरबीआय स्वस्त पैशाचे धोरण (Cheap Money Policy) राबविते.

चलनविषयक धोरण अहवाल

 • प्रकाशन : चलनविषयक धोरण समिती (MPC-Monetary Policy Committee)
 • ऊर्जित पटेल समितीच्या शिफारसीनुसार MPCची स्थापना करण्यात आली व त्यास वैधानिक आधार देण्यासाठी आरबीआय कायदा, १९३४ मध्ये कलम ४५ ZB हे नव्याने टाकण्यात आले.

प्राथमिक कार्य : चलनवाढीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी धोरणात्मक व्याजाचे दर ठरविणे.

Contact Us

  Enquire Now