आयुष्मान सहकार योजना
- केरळमधील सहकारी रुग्णालयांच्या धर्तीवर 18 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री. पुरुषोत्तम रुपाला यांनी आरोग्यसेवा व त्यानिगडित पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी ‘आयुष्मान सहकार’ योजना सुरू केली.
- राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) अंतर्गत ही योजना येते. त्या अंतर्गत संभाव्य सहकारी संस्थांना 10,000 कोटी रुपयांचे कर्ज दिले जाते.
- कर्जाचा कालावधी 8 वर्षे असेल व परतफेडीवर 1-2 वर्षांसाठी सूट असेल.
- ही योजना वैद्यकीय व दंत महाविद्यालये, नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण देणाऱ्या उपक्रमांना समर्थन देईल.
- महिला बहुसांख्यिक सहकारी संस्थांना व्याजदरात 1%ची सूट असेल.
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC)
- सहकारी संस्थांच्या संवर्धन व विकासासाठी 1963 मध्ये संसदेने कायद्याद्वारे (National Co-operative Development Corporation act 1962) या महामंडळाची स्थापना केली.
- या महामंडळाने आजपर्यंत सहकारी संस्थांना 1.60 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.
- देशभरातील एकूण 52 रुग्णालयांना अर्थसहाय्य केले आहे.
- 2 वर्षांखाली NCDCने ‘युवा सहकार’ योजना सुरू केली ज्या अंतर्गत फक्त तीन महिने जुनी सहकारी संस्थाही NCDCकडून अर्थसहाय्य मिळवू शकतात.
- व्यवस्थापकीय संचालक = संदीप कुमार नायक
- मुख्यालय = नवी दिल्ली