आयुष्मान भारत योजना:
- २०१८-१९ च्या बजेटमध्ये घोषणा
- २००७ ची राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या योजनांचे एकत्रीकरण करून योजनेची सुरुवात
- या योजनेअंतर्गत हेल्थ अँड वेलनेस सेंटर आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) हे दोन घटक आहेत.
- सर्वांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचण्यासाठी हेल्थ अँड वेलनेस सेंटर बांधण्यात येतील. असे देशातील पहिले केंद्र बिजापूर (छत्तीसगढ) येथे सुरू झाले.
- २५ सप्टेंबर २०१८ ला आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झाली. (२३ सप्टेंबरला रांची येथून पंतप्रधानांनी योजनेची घोषणा केली)
- या योजनेअंतर्गत देशातील १०.७४ कोटी कुटूंबांना (५० कोटी लोकसंख्या) आरोग्य विमा पुरवण्यात येणार आहे.
- द्वितीय व तृतीय आरोग्य सेवांसाठी मिळणारा हा आरोग्य विमा प्रति वर्षी प्रति कुटुंब पाच लाखांचा असेल.
- हा लाभ देताना कुटुंबातील सदस्यांच्या संख्येचे तसेच त्यांच्या वयाचे कुठलेही बंधन नसते.
- खालील राज्यांनी या योजनेचा स्वीकार केलेला नाही.
- तेलंगणा, ओदिशा, केरळ, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम बंगाल.
- केंद्र-राज्य वाटा = ६० :४०