आयपीएल लिलाव २०२१मध्ये ख्रिस मॉरिस सर्वात महागडा खेळाडू
- दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
- त्याने युवराजसिंगला मागे टाकले. दिल्लीने युवराजला १६ कोटी रुपये खर्चून खरेदी केले होते.
- २०२१च्या लिलावात मॉरिसला राजस्थान रॉयल्सने १६.२५ कोटींची बोली लावून स्वत:कडे घेतले होते. ७५ लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी संघमालकामध्ये रस्सीखेच झाली. चेन्नई, आरसीबी, पंजाब आणि राजस्थान या संघानी मॉरिसला संघात घेण्यासाठी रस दाखवला. मागच्या लिलावात मॉरिसला १० कोटी रुपयांत आरसीबीने खरेदी केले होते. मात्र यंदा त्याला करारमुक्त केले. मॉरिसने आयपीएलच्या ७० सामन्यांत ८० गडी बाद केले असून ५५१ धावा काढल्या आहेत तसे पाहता आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू विराट कोहली आहे. त्याला आरसीबीने १७ कोटी रुपयांत संघात कायम ठेवले.
- ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याला आरसीबीने १४.२५ कोटी रुपयांत संघात घेतले.
- अनकॅप्ड (एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या) खेळाडूमध्ये कृष्णप्पा गौतम लक्षवेधी ठरला. केवळ २० लाख इतकी मूळ किंमत असलेल्या गौतमला सीएसकेने ९.२५ कोटीत खरेदी केले.
- अनपेक्षित बोली ठरलेले खेळाडू
खेळाडू | संघ | बोली (किंमत) |
१) चेतेश्वर पुजारा (सर्वात कमी किंमत) | चेन्नई सुपरकिंग्ज | ५० लाख |
२) स्मिथ स्टिव्ह (ऑस्ट्रेलिया) | दिल्ली कॅपिटल | २.२० कोटी |
३) झाय रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया) | पंजाब किंग्ज | १४ कोटी |
४) रिले मेरेडिथ | पंजाब किंग्ज | ८ कोटी |
५) ग्लेन मॅक्सवेल | आरसीबी | १४.२५ कोटी |
६) ख्रिस मॉरिस | राजस्थान | १६.२५ कोटी |
७) डेव्हिड मलान | पंजाब किंग्ज | १.५ कोटी |
८) शाहरूख खान | पंजाब किंग्ज | ५.२५ कोटी |
९) क्रिष्णप्पा गौथम (सर्वात जास्त किंमत – भारतीय) | चे. सुपरकिंग्ज | ९.२५ कोटी |
१०) काईल जेमिसन | आरसीबी | १५ कोटी |
११) अर्जुन तेंडुलकर | मुंबई इंडियन्स | २० लाख रु. (मूळ किंमतीतच खरेदी) |
आयपीएल २०२० विषयी (१३ वा हंगाम)
- विजेता मुंबई इंडियन्स (५ विकेटनी विजयी) (यापूर्वी २०१३, २०१५, २०१७, २०१९) विजयी
उपविजेता – दिल्ली कॅपिटल्स –
सामनावीर ट्रेन्ट बोल्ट (मुंबई इंडियन्स)
- मालिकावीर – जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल)
- आतापर्यंत सर्व संघाकडून खेळणारा ॲरान फिंच (आठ संघाकडून)