आयटीबीपीमध्ये प्रथमच दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश
-
- भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात (आयटीबीपी) प्रथमच दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- यावेळी एकूण ५३ अधिकारी आयटीबीपीत सामील झाले असून त्यांचे प्रशिक्षण मसुरी येथे झाले आहे.
- प्रकृती व दीक्षा या दोन महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आयटीबीपीचे महासंचालक एस. एस. देसवाल व उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी तारांकित चिन्ह लावले.
- पार्श्वभूमी:
-
- आयटीबीपीने महिलांना २०१६ मध्येच स्थान दिले होते.
- याअंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महिलांची या दलात भरती सुरू झाली, परंतु आतापर्यंत केवळ कनिष्ठ स्तरावरच महिलांचा समावेश होता.
- अधिकारी पातळीवर महिलांची समावेश होण्याची ही पहिलीच वेळ.
- या महिला अधिकाऱ्यांना आता आयटीबीपीच्या संस्थात म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तसेच छत्तीसगडमधील नक्षलविरोधी ऑपरेशन थिएटर येथे त्यांची नियुक्ती केली जाईल.
- इंडो – तिबेट सीमा पोलिस दल:
-
- आयटीबीपी हे केंद्रीय सशस्र पोलीस दल (सीएपीएफ) असून गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
- उभारणी : १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) अधिनियम, १९४९ अंतर्गत १९६२ मध्ये आयटीबीपीची स्थापना झाली.
- अधिकृत आज्ञा (Mandate):
१) चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या सीमेसाठी आयटीबीपी भारताची प्राथमिक सीमा गस्त संस्था आहे.
२) ही नक्षलविरोधी मोहिमा आणि इतर अंतर्गत सुरक्षा कर्तव्यांसाठी देखील तैनात आहे.
३) शिवाय, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेंतर्गत आयटीबीपीचे जवान परदेशातही तैनात केले गेले आहेत.
- भारत आणि चीन दरम्यानच्या ३,४८८ किमीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आयटीबीपीचे जवान प्रतिकूल परिस्थितीतही कार्यरत आहेत.