आयईईई माईलस्टोन सन्मान मिळवणारी जीएमआरटी जगातील पहिलीच रेडिओ दुर्बीण
- रेडिओ खगोलखास्त्रात मोलाचे योगदान देणाऱ्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्काप (जीएमआरटी), खोडद (पुणे) येथील दुर्बिणीला जागतिक सन्मान प्राप्त झाला आहे.
- द इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स (आयईईई) या संस्थेने सन्मानित जीएमआरटी हा भारतातील तिसरा माइलस्टोन आहे.
- यापूर्वी 1895 मधील जे. सी. बोस यांच्या रेडिओ लहरींसंबंधीच्या संशोधनाला आणि 1928च्या सी. व्ही. रमन यांच्या नोबेल विजेत्या प्रकल्पासाठी (प्रकाशाचे विकीरण) 2012 मध्ये माइलस्टोन प्राप्त झाले आहे.
काय आहे जीएमआरटी?
- GMRT : Giant Meterwave Radio Telescope
विस्तार : 30 किमी.
एका अँटीनाचा व्यास : 45 मी.
अँटीनांची संख्या : 30
तरंगलांबी : रेडिओतरंग 110 ते 1460 mh..
कार्यान्वयन : 1990
वापरकर्ते देश : 40 हून अधिक
कार्य – जीएमआरटी ही नवीन दुर्बिणीची रचना, संग्रहाची यंत्रणा आणि ऑप्टिकल फायबर संदेशवहन क्षेत्रातील आद्यप्रवर्तक
- पल्सार, सुपरनोव्हा, आकाशगंगा, क्वासार आणि विश्वविज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन
व्यवस्थापन – नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स
- जीएमआरटी संकल्पना – गोविंद स्वरूप
- Institute of Electrical and Electronics Engineers (IEEE)
- इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स (आयईईई)
- मुख्यालय – न्यू जर्सी (यूएसए)
- स्थापना – 1 जानेवारी, 1963
- ध्येय – मानवतेच्या हितासाठी तंत्रज्ञान व नाविन्यपूर्णता वाढविणे
- आयईईईने वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी योगदानासाठी जगभरातील 212 तांत्रिक प्रणालींना माइलस्टोन म्हणून मान्यता दिली.