आमदार निधीतून एक कोटी रुपये कोरोना प्रतिबंध उपाययोजनांसाठी
- आमदार निधीतून एक कोटी रुपये कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करण्यास आमदारांना मुभा देण्यात आली आहे.
- आमदारांना स्थानिक विकास निधी म्हणून दर वर्षी चार कोटी रु. देण्यात येतात.
- त्यापैकी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांच्या आमदार निधीतून प्रत्येकी एक कोटी रु. निधी वापरण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.
- ३५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
- गेल्या वर्षी ५० लाख रुपये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली होती.
- याशिवाय जिल्हा नियोजन समिती आणि राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) यामधूनही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.