आफ्रिकाखंड पोलिओमुक्त : WHO ची घोषणा

आफ्रिकाखंड पोलिओमुक्त : WHO ची घोषणा

  • २५ ऑगस्ट २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आफ्रिका खंडास पोलिओमुक्त झाल्याचे जाहीर केले.
  • आफ्रिका खंडात पोलिओचा शेवटचा रुग्ण ४ वर्षांपूर्वी नायजेरियात आढळला होता.
  • जगात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पोलिओ आढळला जात आहे.
  • या आजारावर कोणतेही औषध नाही. मात्र पोलिओच्या लसीमुळे बालकांचे या आजारापासून संरक्षण होते.

भारत आणि पोलिओ लसीकरण

  • भारत सरकारने १९७८ साली सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत पोलिओ लसीकरण सुरू केले.
  • १९९५ साली पल्स पोलिओ कार्यक्रम सुरू करण्यात आला.
  • १९९६-९७ : ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण
  • १९९९-२००० : बुथ आधारित लसीकरणासोबतच घरोघरी लसीकरण सुरू केले गेले.
  • पोलिओचा शेवटचा रुग्ण भारतात १३ जानेवारी २०११ रोजी हावडा (पश्चिम बंगाल) येथे आढळला.
  • २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आशियाई प्रदेश ज्यात भारत समाविष्ट आहे, या प्रदेशाला पोलिओमुक्त घोषित केले. 
  • भारत सरकारने ३० नोव्हेंबर २०१५ पासून मौखिक लसीकरणासह इंजेक्शनद्वारे लसीकरण (IPU) सुरू केले.

पोलिओ

  • विषाणू – Entero Viruses
  • प्रसार – दूषित अन्न व पाणी
  • अवयव – मध्यवर्ती चेतासंस्था (CNS)
  • लक्षण – ताप, घसा लाल होणे, हातपाय लुळे पडणे

उपचार – लस

Contact Us

    Enquire Now