आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना
- ही योजना राज्यात राबवण्यासाठी सेवा पुरवठा दाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ देण्याबाबत मान्यता देण्यात आली. आता ही योजना १ फेब्रुवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.
काही महत्वाचे मुद्दे
- शेती उत्पादनासाठी शेती कर्ज विविध बँकांमार्फत उपलब्ध करण्याचे नियोजन सहकार विभागामार्फत करण्यात येते.
- कृषी पर्यटनात शेती ७० ते ८० टक्के असणे आवश्यक आहे. तर शेतकरी हा शेती आणि पर्यटकांमधील दुवा असतो. कृषी पर्यटनाविषयी प्रसार आणि प्रचार करण्याचे काम ॲग्रो टूरिझम विश्व करत आहे.
- स्ट्रॉबेरीचा ‘हेलो डाब’ नंदुरबारमधील सातपुड्याच्या पर्वतराजीत आदिवासी बांधवांनी विकसित केला आहे.
- दादर ज्वारी (रब्बी ज्वारी) चे उत्पादन धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात घेतले जाते.
- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला १६ जुलै २०२१ रोजी ५० वर्षे पूर्ण होणार आहेत.
- आयुष मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोड्डामार्ग तालुक्यातील मौ. अडाळी येथे स्थापन करण्यास केंद्र शासनाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.