आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोलिसांचा ११२ क्रमांक

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोलिसांचा ११२ क्रमांक

  • आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना त्वरित मदत देण्यासाठी आता महाराष्ट्र पोलिसांकडून ११२ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे.
  • हा नवा पोलीस मदतीचा क्रमांक सुरू झाल्यानंतर त्यापूर्वीचा १००आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक बंद करण्यात येणार आहे.
  • ही नवीन सेवा जीपीएस प्रणालीवर आधारित असेल. एखाद्या व्यक्तीने मदतीसाठी दूरध्वनी केल्यानंतर त्वरित मदत उपलब्ध होईल तसेच पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी आणखी कमी होणार आहे.
  • महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन सेवांसाठी ११२ हाच हेल्पलाइन क्रमांक असेल ही सेवा बहुभाषिक सेवा असल्यामुळे तक्रारदाराला भाषिक अडचण येणार नाही.
  • बऱ्याचदा पोलिसांच्या १०० आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर खोटी माहिती देणारे फसवणूक करणारे दूरध्वनी येतात परंतु आता नवीन यंत्रणेद्वारे संपर्क साधणारी व्यक्ती कोठून बोलत आहे याबाबत माहिती त्वरित उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दूरध्वनीद्वारे आलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होऊन पोलिसांना प्रत्यक्ष घटनास्थळी लवकर उपलब्ध होता येणार आहे.

Contact Us

    Enquire Now