आण्विक पाणबुडी युती
- ऑस्ट्रेलिया, यूएस आणि यूके यांनी संवेदनशील आण्विक पाणबुडी माहिती देवाणघेवाण करण्यास परवानगी देणारा करार केला आहे. AUKUS अंतर्गत हा करार करण्यात आला आहे.
- चीन-अमेरिका यांत वाढत असणाऱ्या तणावाचा सामना करण्यासाठी वरील तीन देशांनी AUKUS ची स्थापना केल्यानंतरचा हा पहिला करार आहे.
- या करारांतर्गत ऑस्ट्रेलियाला आठ अत्याधुनिक अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या मिळतील.
AUKUS
- स्थापना – सप्टेंबर २०२१
- सहभागी राष्ट्रे – ऑस्ट्रेलिया, यूएस, यूके
महत्त्वाचे –
- ऑस्ट्रेलिया हे हिंद-प्रशांत महासागरातील रणनीतीचे केंद्र आहे. ज्याच्या पश्चिमेकडे हिंदी महासागर तर पूर्वेकडे पॅसिफिक महासागर आहे. उत्तर गोलार्धात अमेरिकेचे अनेक लष्करी तळ व मित्रराष्ट्र आहे. मात्र दक्षिण गोलार्धात तुलनेने ही स्थिती कमकुवत आहे. त्यामुळे तेथील राजकीय परिस्थिती बळकट करण्यास या करारामुळे अमेरिकेला फायदा होणार आहे.