आणखी २५ देशांकडून भारताकडे लसींची मागणी
- भारताने आतापर्यंत १५ देशांना कोविड-१९ लसीचा पुरवठा केला असून आणखी २५ देशांकडून भारतात तयार करण्यात आलेल्या लसीला मागणी आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
- काही गरीब देशांना अनुदानाच्या स्वरूपात लस पुरवण्यात येत असून काही देश भारत सरकारने ज्या किंमतीत लस खरेदी केली आहे, त्या किंमतीत लस घेऊ पाहत आहेत. तर काही देशांनी थेट औषध कंपन्यांशी करार केला आहे.
- केंद्र सरकारने भारत बायोटेकची ‘कोव्हॉक्सिन’ व ऑक्सफर्डची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली ‘कोव्हिशील्ड’ या लसींना मान्यता दिली असून १६ जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू झाले आहे. रेड्डीज औषध कंपनीने रशियाची ‘स्पुटनिक – ५’ लस तयार करून युरोपात परवानगी मागण्याचे ठरवले आहे.
- देशात आतापर्यंत ५४ लाख लोकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. सर्वाधिक म्हणजे ६ लाख ७३ हजार जणांचे लसीकरण उत्तर प्रदेशात झाले आहे. महाराष्ट्रात ४ लाख ३४ हजार जणांना तर राजस्थानात ४ लाख ४ हजार जणांना लस दिली आहे.