आठ सागरी किनार्‍यावर बीच शॅक्सला ठाकरे सरकारची मान्यता

आठ सागरी किनार्‍यावर बीच शॅक्सला ठाकरे सरकारची मान्यता

  • राज्यातील समुद्रकिनार्‍यावर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भात धोरणास मान्यता देण्यात आली आहे.
  • राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून हे बीच शॅक्स तात्पुरता हंगामी स्वरूपातील असतील.
  • सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर आणि तारकर्ली, पालघर जिल्ह्यातील बोर्डी, केळवा तर रायगड जिल्ह्यातील दिवेआगर आणि पर्सोली या आठ किनार्‍यावर बीच शॅक्स उभारण्यात येतील.
  • या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
  • पर्यटन संचालनायाने निश्चित केलेल्या जागेवरच बीच शॅक्स उभारण्यास परवाना देण्यात येईल तत्पूर्वी महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची सहमती आवश्यक असेल.
  • एका चौपाटीवर कमाल १० बीच शॅक्स उभारत येतील ती उभारण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल. तिथे निर्माण होणार्‍या रोजगारामध्ये ८० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव असतील.
  • बीच शॅक्स सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत सुरू असतील. प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरादेखील असणार आहे.

कोकण किनारपट्टीविषयी :

  • महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून विचार करता कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेकडील बोर्डी तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंत तर पूर्व-पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रापासून ते सह्याद्री पर्वतापर्यंत आहे. उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे खूप तीव्र स्वरूपाचा आहे.
  • पश्चिम किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी ५६० किमी असून कोकण किनारपट्टीला लागून असणार्‍या समुद्र किनारपट्टीची लांबी ७२० किमी आहे.

महाराष्ट्रातील काही पुळणे : (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

 

पालघर जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई आणि मुंबई उपनगर
बोर्डी ठाणे मनोरी
डहाणू मढ
सातपाटी दादर
अर्नाळा गिरगाव
जुहू

 

रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा
अलिबाग हर्णे दाभोली
जंजिरा गुहागर तारकर्ली
मुरुड जयगड मोचेमाळ
श्रीवर्धन गणपतीमुळे उभादांडा
हरिहरेश्वर भाटे

Contact Us

    Enquire Now