आंध्रप्रदेशमध्ये पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प उभारणार
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडून आंध्रप्रदेशमध्ये भारतातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येत आहे.
- आंध्रप्रदेशमधील सिंहाद्री (Simhadri) येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
- २०७० पर्यंत कार्बन न्यूट्रल या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
- या प्रकल्पामध्ये २४०KW सॉलिड ऑक्साइड इलेक्ट्रोलायझरचा वापर करण्यात येणार आहे. (Solid Oxide Electrolyser) त्यासाठी आवश्यक ती वीज जवळच्या तरंगत्या सौर प्रकल्पातून घेतली जाणार आहे.
- या प्रकल्पातून तयार झालेला हायड्रोजन वायू उच्च दाबासह जमा केला जाईल व त्याचे Solid Oxide Fuel cellच्या मदतीने विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केले जाईल.
- अशा रीतीने स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देण्यात येणार आहे.
- भारतात ८५% तेल व ५३% नैसर्गिक वायूची आयात केली जाते. हायड्रोजन वायूचा ऊर्जानिर्मितीमध्ये वापर केल्यास भारताचे ऊर्जाक्षेत्रामध्ये परकीय अवलंबत्व कमी होईल.