आंतरराष्ट्रीय ऊर्जाएजन्सी (IEA)-
- आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने आपलाइंडिया एनेर्जी आऊटलुक 2021 अहवाल जाहीर केला.
- या अहवालानुसार 2030 पर्यंत युरोपियन युनियनला मागे टाकून भारतात येत्या दोन दशकांमध्ये ऊर्जा मागणी 25% नी वाढेल.
- देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन(GDP) 2040 पर्यंत 8.6 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा केल्याने भारताच्या ऊर्जेचा वापरही जवळपास दुप्पट होईल.
- पेट्रोलियम पदार्थांचा शोध उत्पादन आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याची सरकारची धोरणे असूनही मात्र ऊर्जेची गरज भागवण्यासाठी भारताला जीवाश्म इंधनांच्या आयाती वरच अधिक विसंबून राहावे लागेल.
- IEA नुसार भारताची तेलाची मागणी 8.7 दशलक्ष पिपेप्रतिदिन एवढी 2040 पर्यंत वाढेल. (2019 ची मागणी 5 दशलक्ष टिपे प्रतिदीन) व तसेच शुद्धीकरणाची क्षमता 2030 पर्यंत 6.4 दशलक्ष व 2040 पर्यंत 7.7 दशलक्ष पिपे प्रतिदिन एवढी वाढेल.
- वाढत्या तेलाच्या मागणीमुळे भारताचे तेल आयात बिल 2030 पर्यंत 181 अब्ज डॉलर व 2040 पर्यंत 255 अब्ज डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी बद्दल-
a) स्थापना-1974
b) मुख्यालय -पॅरिस
c) सदस्य- 30 (सदस्य देश हा OECD चा सदस्य असावाच लागतो)
d) आर्थिक सहयोग व विकास संघटना (OECD) अंतर्गत स्वतंत्र व अंतर शासकीय संस्था आहे.
e) 1973-74 च्या तेल संकटानंतर या संस्थेची स्थापना झाली.
f) अहवाल –
-
- Global Energy and co2 status report.
- World Energy Outlook.
- World Energy Statistics.
- World Energy Balance.
- Energy Technology Perspective.