आंतरराष्ट्रीय इनी पुरस्कार 2020 जाहीर : भारतरत्न सी. एन. आर. राव
- ऊर्जा संशोधन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय इनी पुरस्कार 2020 हा भारतरत्न प्राध्यापक सी. एन. आर. राव यांना जाहीर करण्यात आला आहे.
- अक्षय ऊर्जा स्रोत आणि ऊर्जा साठा या क्षेत्रात केलेल्या संशोधन कार्याबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार ऊर्जा फ्रंटियर ॲवॉर्ड म्हणून परिचित आहे.
पुरस्कार प्रदान समारंभाचे ठिकाण: क्विरिनल पॅलेस, रोम
- दिनांक: 14 ऑक्टोबर 2021
- आवृत्ती: 12वी (जुलै 2008 पासून)
- प्रमुख उपस्थिती: इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला
- उद्देश: ऊर्जास्रोतांचा सुयोग्य वापर करण्यास प्रोत्साहन आणि नव्या पिढीला या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी पाठबळ तसेच प्रोत्साहन देणे.
- पुरस्कार देणारी संस्था: इटालियन तेल व वायू कंपनी
- पुरस्काराचे स्वरूप: रोख रक्कम आणि सुवर्णपदक
सी. एन. आर. राव
- चिंतामणी नागेश रामचंद्र राव
- जन्म: 30 जून 1934 (बंगळूरू)
- कन्नड भाषिक भारतीय रसायनशास्त्रज्ञ
- मानवजातीच्या हितासाठी एकमेव ऊर्जास्रोत म्हणून हायड्रोजन ऊर्जेवर ते काम करत आहेत.
- हायड्रोजनची साठवण, हायड्रोजनचे फोटोकेमिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल उत्पादन, नॉन मेटॅलिक कॅटॅलिसिस तसेच हायड्रोजनचे सौर उत्पादन ही त्यांच्या कामांची वैशिष्ट्ये आहेत.
- मेटल ऑक्साईड्स्, कार्बन नॅनोट्यूब्ज् आणि इतर साहित्य, द्विमीतीय प्रणाली ज्यात ग्राफिन, बोरॉन-नायट्रोजन-कार्बन हायब्रीड मटेरियल आणि मॉलिब्डेमन सल्फाईड (मॉलिब्डेनाईट – MOS2) यांचा ऊर्जा अणुप्रयोग आणि हरित हायड्रोजन उत्पादन यासंबंधित त्यांच्या कार्यासाठी त्यांना एनर्जी फ्रंटिअर्स हा पुरस्कार देण्यात आला आहे.
- घनस्थिती रसायनशास्त्र (Solid State Chemistry) आणि संरचनात्मक रसायनशास्त्र (Structural Chemistry) हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय.
- आजवर त्यांनी 1400 शोधनिबंध तसेच 45 पुस्तके प्रकाशित केले आहेत.
पुरस्कार
- 1968: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
- 1974: पद्मश्री
- 1985: पद्मभूषण
- 2013: भारतरत्न