‘अवैध वन्यजीव व्यापार’ अहवाल
- प्रथमच Financial Action Task Force ने वन्यजीवांच्या होणार्या बेकायदेशीर व्यापारावर अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाप्रमाणे वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापाराची किंमत ७ ते २३ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
- FATF ही काळा पैसा आणि अवैध व्यापार तसेच दहशतवादासाठी वापरला जाणारा पैसा याविरोधात काम करणारी आंतरराष्ट्रीय स्वायत्त संघटना आहे. FATF चे मुख्यालय पॅरिस येथे असून जगभरातील ३७ राष्ट्रे (भारतासह) आणि २ प्रादेशिक संघटना या संस्थेचे सदस्य आहेत.
अहवालातील निरीक्षणे :
१) राष्ट्रीय न्याययंत्रणांचे वन्यजीवांच्या अवैध व्यापाराकडे सहसा दुर्लक्ष.
२) इ-बँकिंग संकेतस्थळे, हवाला, हुंडी, फेई चेन, वायर ट्रान्स्फर या माध्यमांचा उपयोग अवैध व्यवहारांसाठी केला जातो.
३) ऑनलाईन बाजारपेठा, सोशल मीडिया, आयात निर्यात कंपन्या यांचाही उपयोग या अवैध व्यापारासाठी करण्यात येत आहे.
४) काळा पैसा आणि अवैध वन्यजीव व्यापार यांचा विविध क्षेत्रांमधील मेळ लक्षात घेऊन राष्ट्रीय कायदे बनवण्यात यावे असे अहवाल म्हणतो.