अरुण जेटली आर्थिक सहाय्य योजना
- राज्यसभा सचिवालयाने माजी केंद्रीय अर्थमंत्री यांच्या नावाने केंद्रीय सी-वर्ग कर्मचार्यांसाठी अरुण जेटली आर्थिक सहाय्य ही कर्मचारी कल्याण योजना सुरू केली.
- राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांच्या पेन्शनद्वारे जेटली यांच्या कुटुंबाला मिळणार्या निधीतून अर्थसहाय्य मिळणार आहे. अरुण जेटली यांची पत्नी संगीता जेटली यांच्या निर्णयाच्या आधारे ही योजना तयार आणि मंजूर करण्यात आली आहे.
- २४ ऑगस्ट २०१९ रोजी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर, राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकैय्या नायडू यांना संगीता जेटली यांनी कौटुंबिक पेन्शनचा वापर राज्यसभा सचिवालयातील गट सी कर्मचार्यांच्या फायद्यासाठी करण्यासाठी निवेदन सादर केले.
- राज्यसभेचे सरचिटणीस, देश दीपक वर्मा यांनी राज्यसभा सचिवालयाद्वारे तयार केलेल्या योजनेस मंजुरी दिली आणि ही योजना २०२० पासून लागू होईल.
योजनेची वैशिष्ट्ये :
- गट सी कर्मचार्यांच्या मुलांना अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि एमसीए/एमबीए/एलएलबीच्या उच्च तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.
ii. गट सीच्या कर्मचार्यांना मृत्यू आणि आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत आर्थिक मदत दिली जाईल.