अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडी करारावर स्वाक्षरी करणारा १०१वा देश

अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडी करारावर स्वाक्षरी करणारा १०१ वा देश

 • अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य होणारा १०१ वा देश ठरला आहे.
 • ग्लासगो येथील COP-२६ हवामान परिषदेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे हवामानविषय विशेष दूत जॉन कॅरी यांनी औपचारिकपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली.

महत्त्व :

 • आंतरराष्ट्रीय सौर आघाडी वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड (एक सूर्य, एक जग, एक ग्रिड) च्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी आहे, जी इतरांच्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी एका प्रदेशात निर्माण होणारी सौरऊर्जा हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करते.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी

 • स्थापना : ३० नोव्हेंबर २०१५, संयुक्त राष्ट्रसंघाच्या पॅरिसमधील COP-२१ परिषदेदरम्यान (हवामान बदलावरील परिषद) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी केली.
 • मुख्यालय : गुरुग्राम (हरियाणा)
 • सदस्य देश : १२४
 • उद्देश : जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौरऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी काम करणे.
 • नोव्हेंबर २०१६ मध्ये मर्राकेश (मोरोक्को) येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी फ्रेमवर्क करार स्वाक्षरीसाठी खुला झाला आहे.
 • अमेरिकेसहित या करारावर आजतागायत १०१ देशांनी स्वाक्षरी केली आहे.
 • पूर्वी हा करार केवळ कर्कवृत्त व मकरवृत्तादरम्यानच्या देशांसाठीच खुला होता. मात्र जानेवारी २०२१ पासून हा करार संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांसाठी खुला करण्यात आला आहे.

Contact Us

  Enquire Now