अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांची भारतभेट

 

अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांची भारतभेट

 

  • 27 आणि 28 जुलैला अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारताला भेट दिली. परराष्ट्रमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यानंतर ही त्यांची पहिलीच भारतभेट आहे.
  • संबंधित भेटीचा प्रमुख उद्देश भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे तसेच क्वाड फ्रेमवर्क (quad framework) अंतर्गत इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये एकमेकांना सहकार्य करणे हा होता. 
  • ब्लिंकन यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर , राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी  ‍यांची भेट घेतली. 
  • भेटीदरम्यान भारताचे लसीकरण कार्यक्रमाला सहाय्य म्हणून त्यांनी 186 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. 
  • हा निधी US Agency for International Development (USAID)  संस्थेद्वारे पुरवला जाईल. 
  • मार्च 2020  पासून USAID संस्थेने  भारताच्या कोविड  महामारीविरुद्ध लढ्यासाठी जवळपास 1670  कोटींची मदत केली आहे. 
  • वरील मदतीशिवाय दोन्ही राष्ट्रांनी चीनच्या इंडो-पॅसिफिक आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी बहुउद्देशीय संरक्षण भागीदारीला आणखी मजबूत करण्याची संमती दर्शवली.
  • तसेच अफगाणिस्तान मधल्या ढासळत्या सुरक्षात्मक  व्यवस्थेबद्दलही चर्चा झाली.
  • दोन्ही देशांमध्ये 2016, 2018 आणि 2020  मध्ये अनुक्रमे  LEMOA, COMCASA आणि BECA  हे संरक्षण करार झाले आहेत.
  • LEMOA (Logistics Exchange Memorandum of Agreement) :  या करारांतर्गत दोन्ही देश  एकमेकांचे लष्करी तळ  वापरू शकतात.
  • COMCASA (Communications Compatibility and Security Agreement) : या करारामध्ये दोन्ही देशांचे सैन्य सुरक्षात्मक कारणांसाठी एकमेकांच्या संप्रेषण सुविधांच्या वापरासाठी परवानगी देऊ  शकतात.
  • BECA (Basic Exchange and Cooperation Agreement ) : या करारामध्ये दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय लष्करी तंत्रज्ञान, रसद आणि भौगोलिक नकाशे एकमेकांमध्ये वापरण्याची तरतूद आहे. 
  • क्वाड फ्रेमवर्क (quad framework) : 
  • क्वाड हे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांमधील  संरक्षण चर्चेसाठीचे व्यासपीठ (security dialogue framework) आहे.
  • क्वाड’ची स्थापना २००७ मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांच्या पुढाकाराने झाली. ‘क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग’ असे याचे स्वरूप होते. चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी या गटाची स्थापना झाली होती.
  • सुरुवातीला हा एक अनौपचारिक गट होता परंतु आता याला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे.
  • आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन या चार देशांमध्ये मलबार युद्ध सराव होत असतो. तसेच इतर सुरक्षाविषयक भागीदारीसुद्धा या देशांमध्ये क्वाड फ्रेमवर्क अंतर्गत सुरू झाली आहे.

Contact Us

    Enquire Now