अमिताभ कांत यांचे नवे पुस्तक

अमिताभ कांत यांचे नवे पुस्तक

 • निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी 24 जुलैला भारतातील स्टार्टअप संस्कृतीबद्दल Shifting Orbits: Decoding the Trajectory of the Indian Start-up Ecosystem‘शीर्षकाच्या नव्या पुस्तकाचे अनावरण केले.
 •    थील्लई राजन (IIT मद्रास), श्रीवर्धिनी झा (IIM बेंगलोर),जॉफी थॉमस (IIM कोझिकोडे),रोहन चिंचवडकर (IIT  बॉम्बे) हेसुद्धा अमिताभ कांत यांच्यासोबत सदर पुस्तकाचे लेखक आहेत. 
 • हे पुस्तक भारतातील स्टार्ट क्षेत्राच्या नवकल्पना, निधी, उद्यमता आणि इन्क्युबेशन कालावधी या मुख्य चार अंगांबद्दल विश्लेषण करते.
 • या पुस्तकाचे ऑनलाइन अनावरण करण्यात आले.
 • अनावरण करताना केली अमिताभ कांत यांनी खालील मुद्द्यांना अधोरेखित  केले.
 • भारत ही जगातील मुख्य  अर्थव्यवस्थांपैकी सर्वात वेगाने डिजिटायझेशन होणारी दुसरी अर्थव्यवस्था आहे.
 •  डिजिटल ग्राहक अर्थव्यवस्था, जी 2020 मध्ये 90 अब्ज डॉलर्स एवढ्या आकाराची आहे ती 2030 पर्यंत 800 अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
 • जून 2021 मध्ये  यूपीआयद्वारे 2.8 अब्ज ट्रांझॅक्शन झाले आहेत. याची एकूण किंमत 5.4  ट्रिलियन डॉलर एवढी आहे. 
 • IPO (Initial Public Offering ) मध्ये स्टार्ट क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.
 • एखादी खासगी कंपनी जेव्हा पहिल्यांदा आपले शेअर्स विकायला काढते तेव्हा त्यास IPO असे म्हणतात. याद्वारे भारतीय जनता नवीन  स्टार्टअपचे शेअर्स विकत घेईल व याद्वारे स्टार्टअप्सना  गुंतवणूक प्राप्त होईल.
 • 2021मध्ये भारतीय स्टार्टअप्स 13.7 अब्ज डॉलर्स एवढा निधी उभारण्याची शक्यता आहे. सध्या भारतात एकूण 52 युनिकॉर्न स्टार्टअप्स आहेत.
 • युनिकॉर्न स्टार्टअप्स :  असे स्टार्टअप्स  ज्यांची एकूण मूल्य एक अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे.

Contact Us

  Enquire Now