अब्दुल्ला शाहीद संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी

अब्दुल्ला शाहीद संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी

  • ७ जून २०२१ रोजी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहीद यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
  • हे अधिवेशन सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू होईल.
  • एकूण मतदान झालेल्या १९१ मतांपैकी अब्दुल्ला शाहीद यांना १४३ मते मिळाली.
  • संयुक्त राष्ट्र, महासभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री डॉ. झल्माई रसूल यांना ४८ मते मिळाली.
  • संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ७५ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष तुर्कीचे व्होल्कन बोजकीर हे होते.
  • प्रादेशिक रोटेशनच्या प्रस्थापित नियमांनुसार संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आशिया-पॅसिफिक राज्यांच्या गटातून निवडले जाणार होते.

संयुक्त राष्ट्र महासभा

  • स्थापना – २४ ऑक्टोबर १९४५
  • त्यावेळी सदस्य संख्या – ५१
  • सध्याचे सदस्य – १९३
  • भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.
  • मुख्यालय – न्यूयॉर्क
  • कार्यालयीन भाषा – अरेबिक, चायनिज, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, इंग्लिश
  • ५१ सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत लंडन येथे पहिली साधारण सभा पार पडली.

महासभा

  • ही मध्यवर्ती यंत्रणा असून यात सर्व सदस्य राष्ट्रांना समान अधिकार आहेत.
  • महासभेचे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात एक नियमित अधिवेशन भरवले जाते.
  • आमसभा जेव्हा महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतदान घेते तेव्हा उपस्थित आणि मतदानात सहभागी सदस्यांच्या दोन-तृतीयांश बहुमताने निर्णय घेतले जातात, यात पुढील बाबी समाविष्ट होतात.

१) शांतता आणि सुरक्षेच्या मुद्यावरील शिफारसी करणे.

२) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या इतर घटक संस्थांमधील निवडणुका घेणे.

३) एखाद्या देशास सदस्यत्व देणे, त्याचे निलंबण करणे किंवा त्याला काढून टाकणे (यासाठी सुरक्षा परिषदेची शिफारस आवश्यक असते.)

४) अर्थसंकल्पीय बाबी इ.

  • इतर प्रश्नांवर महासभा बहुमताने निर्णय घेते.
  • आमसभेतील कामकाजादरम्यान १ अध्यक्ष आणि २१ उपाध्यक्ष कार्यरत असतात.

आमसभेच्या प्रमुख समित्या

  • पहिली समिती – निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित
  • दुसरी समिती – आर्थिक आणि वित्तीय बाबी
  • तिसरी समिती – सामाजिक, मानवतावादी आणि सांस्कृतिक बाबी
  • चौथी समिती – विशेष राजकीय व निर्वाहसाहतीकरणाशी संबंधित
  • पाचवी समिती – प्रशासकीय व अर्थसंकल्पीय बाबी
  • सहावी समिती – न्यायिक बाबी
  • याबरोबरच पुढील २ समित्या कार्यरत असतात.

१) साधारण समिती – आमसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वरील समित्यांचे अध्यक्ष यांची मिळून तयार झालेली ही समिती पर्यवेक्षणाचे काम करते.

२) क्रेडेंशियल समिती – संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधींच्या पात्रता/यश याबाबत काम करते.

Contact Us

    Enquire Now