अफगाणिस्तानातील तीन प्रांताच्या राजधान्या तालिबानच्या ताब्यात

अफगाणिस्तानातील तीन प्रांताच्या राजधान्या तालिबानच्या ताब्यात

 • तालिबानने अफगाणिस्तानातील तीन प्रांतांच्या राजधान्या काबीज केल्या आहेत.
 • ईशान्येकडील बदाकशाह व बालघाण प्रांताच्या राजधान्या व पश्चिमेकडील फराह प्रांताची राजधानीही तालिबानच्या ताब्यात गेली आहे.
 • याआधी कुंदुझ येथील महत्त्वाचा तळही तालिबानी दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले आहेत.
 • त्यामुळे देशाचा एकूण दोन तृतीयांश भाग त्यांनी काबीज केल्याने अफगाणिस्तानच्या सरकारची चिंता वाढली आहे.
 • फराह येथे अफगाणी सुरक्षा दलाच्या जवानांचे मृतदेह रस्त्यावर टाकले आणि ‘गॉड इज ग्रेट’ अशा घोषणा दिल्या.
 • तालिबानच्या दहशतवाद्यांकडे एम १६ रायफली असून हुमवीस व फोर्डचे पिकअप ट्रक यांनी ताब्यात घेतले आहेत.
 • हे ट्रक्स अमेरिकेने अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना दिले होते.
 • कुंदुझ विमानतळाजवळील अफगाण राष्ट्रीय लष्कराच्या २१७व्या कोअरचे मुख्यालय तालिबानच्या ताब्यात गेले आहे.
 • अफगाणिस्तानातील ४०० जिल्ह्यांपैकी २२० जिल्हे तालिबानच्या हाती गेले आहेत.

Contact Us

  Enquire Now