अनुपम श्याम ओझा

अनुपम श्याम ओझा

  • जन्म – २० सप्टेंबर १९५७ (प्रतापगड, उत्तरप्रदेश)
  • मृत्यू – ८ ऑगस्ट २०२१ (मुंबई)
  • छोट्या पडद्यावर ‘ठाकूर’ च्या भूमिकेतून लोकप्रिय झालेले आणि हिंदी चित्रपटाबरोबरच दूरचित्रवाणी मालिकेमध्ये विविधांगी भूमिका बजावणारे अनुपम श्याम ओझा यांचे निधन झाले, ते ६३ वर्षांचे होते.
  • लखनऊच्या “भारतेन्दु ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स्”मधून प्रशिक्षण घेतले होते.
  • हिंदी चित्रपटात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या, पण त्यांना लोकप्रियता मिळाली ती छोट्या पडद्यावरील ‘मन की बात-प्रतिज्ञा’ या मालिकेतील सज्जनसिंग ठाकूर या भूमिकेने.
  • २००८ साली प्रदर्शित झालेल्या डॅनी बोयल दिग्दर्शित ‘स्लॅमडॉग मिलेनिअर’ मध्येही त्यांनी काम केले होते.
  • त्यांनी सरदारी बेगम, तमन्ना, दस्तक, दुश्मन, सत्या, हजार चौरासी की माँ, ज़ख्म, संघर्ष, हल्ला बोल, हज़ारों ख्वाइशे ऐसी, रामगोपाल वर्माचा ‘रक्तचरित्र’ या अनेक हिंदी चित्रपटातून भूमिका साकारल्या होत्या.
  • पुरस्कार

१) इंडियन टेली पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेता नकारात्मक भूमिका – २०१० (मन की आवाज़ – प्रतिज्ञा)

२) स्टार परिवार पुरस्कार – मज़ेदार सदस्य भूमिका – २०१० – मन की आवाज – प्रतिज्ञा

 

Contact Us

    Enquire Now