अनाथ बालकांना अर्थसाहाय्य
- कोविडमुळे आईवडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लाभार्थी :
- १ मार्च २०२० रोजी व त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक मृत्यू पावलेले किंवा एका पालकाचा कोविड १९ मुळे व अन्य पालकाचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास किंवा एका पालकाचा (१ मार्च २०२०) पूर्वीच मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर एका पालकाचा कोविडने मृत्यू झाला असल्यास ० ते १८ वयोगटातील बालकांचा या योजनेत सहभाग होणार आहे.