अखिल भारतीय घरगुती कामगार सर्वेक्षण
- केंद्र सरकारने प्रथमच घरगुती कामगारांची माहिती गोळा करण्यासाठी देशभरात सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे.
- सर्वेक्षणाचा उद्देश – राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर घरगुती कामगार, संघटित किंवा असंघटित रोजगार, स्थलांतरित किंवा अस्थलांतरित कामगार यांचे वेतन आणि इतर सामाजिक-आर्थिक परिस्थितीची माहिती गोळा करणे.
- सर्वेक्षणात ३७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल.
- देशातील ७४२ जिल्ह्यांमधील १.५ लाख कुटुंबांचा समावेश या सर्वेक्षणात करण्यात येईल.
- घरगुती कामगारांसाठीचे सर्वेक्षण हे पाच राष्ट्रीय रोजगार सर्वेक्षणांपैकी एक असून याचा फायदा आगामी राष्ट्रीय रोजगार धोरणासाठी महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करण्यास होईल.
भारतातील रोजगार सर्वेक्षणातील इतर चार सर्वेक्षणे –
अ) अखिल भारतीय स्थलांतरित कामगारांचे सर्वेक्षण
ब) व्यावसायिकांनी दिलेल्या (व्युत्पन्न केलेल्या) रोजगाराचे अखिल भारतीय सर्वेक्षण
क) परिवहन क्षेत्रातील रोजगार निर्मितीचे अखिल भारतीय सर्वेक्षण
ड) अखिल भारतीय त्रैमासिक स्थापना – आधारित रोजगार सर्वेक्षण (All India Quarterly Establishment – based Employment Survey : AIEES)
गरज :
- घरगुती कामगार हा कृषी आणि बांधकाम क्षेत्रानंतर कामगारांचा तिसरा सर्वात मोठा वर्ग आहे.
- अनौपचारिक क्षेत्रातील महत्त्वाचा भाग असलेल्या घरगुती कामगारांच्या परिमाण आणि प्रचलित रोजगार परिस्थितीसंबंधित माहितीची कमतरता.
- यामुळे सरकारला कामगारांच्या काही विशेष आणि असुरक्षित विभागांवरील महत्त्वाच्या समस्या समजून घेण्यास व प्रभावी धोरण राबविण्यास मदत होईल.
घरगुती कामगारांची सद्यस्थिती आणि भारत
- इ-श्रम पोर्टलनुसार, नोंदणीकृत ८.५६ कोटी असंघटित कामगारांपैकी ८.८ टक्के (७५.३३ लाख) घरगुती कामगार आहेत.
- भारत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या कन्व्हेन्शन C-१८९ (घरगुती कामगार परिषद, २०११) चा स्वाक्षरीकर्ता देश आहे.