अंजली भारद्वाज यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
- भ्रष्टाचार विरोधात खंबीरपणे लढणाऱ्या १३ धैर्यवान व्यक्तींची अमेरिकेने भ्रष्टाचारविरोधी पुरस्कारासाठी निवड केली असून त्यात अंजली भारद्वाज यांचा समावेश आहे.
- भारद्वाज यांना गेली दोन दशके भारतात माहिती अधिकार कायद्याच्या चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.
- भारद्वाज यांच्याशिवाय अरडियन वोरानी, डायना सालझार, सोफिया पेट्रिक, जुऑन फ्रान्सिस्को सँडोवल अल्फारो, घुहा ए महमंद, इब्राहिम कालील ग्वेये, बोलोटटेमिरोव, मुस्तफा अब्दुला सनला, व्हिक्टर सोटो, फ्रान्सिस बेन कैफला, रुसलान रायबोशापका यांचा पुरस्कार्थीत समावेश आहे.
- अंजली भारद्वाज ह्या सतर्क नागरिक या संघटनेच्या संस्थापक असून त्यांनी सरकारची पारदर्शकता व नागरिकांचा सक्रिय सहभाग यावर भर दिला. नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राईट टू इनफॉर्मेशन या संस्थेच्या त्या निमंत्रक असून त्यांनी भ्रष्टाचारविरोधात लोकपालाची संकल्पना मांडण्यात पुढाकार घेतला होता. व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ॲक्टसाठीही त्यांनी काम केले आहे.