अंकिता रैनाचे पहिले डब्ल्यूटीए जेतेपद
- भारताची स्टार टेनिसपटू अंकिता हिने रशियाची जोडीदार कॅमिला रखिमोणा हिच्या सोबतीने फिलीप ऑलून्ड चषक टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
- अंकिताचे हे पहिले डब्ल्यूटीए विजेतेपद आहे. या जेतेपदामुळे २८ वर्षांच्या अंकिताला महिला खेळाडूंच्या दुहेरी क्रमवारीत अव्वल शंभर खेळाडूंमध्ये स्थान मिळाले.
- सानिया मिर्झानंतर अशी कामगिरी करणारी अंकिता दुसरी टेनिसपटू बनली आहे. अंकिता-कॅमिला जोडीने अंतिम फेरीत ॲना बिलिनकोवा – ॲनेस्तेसिया पोटापोवा या रशियाच्या जोडीचा २-८, ६-४, १०-७ ने पराभव केला.
- या दोघींना आठ हजार डॉलर्स आणि २८० रँकिंग गुण मिळाले आहेत. यामुळे पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये अंकिता ९४व्या स्थानावर दाखल होईल. ती सध्या ११५व्या स्थानी आहे.
- अंकिताने याआधी आयटीएफ दुहेरीचे तसेच डब्ल्यूटीए १२५ के सीरीजचे जेतेपद पटकावले आहे. पुढील आठवड्यात ती ॲडलेड इंटरनॅशनल स्पर्धेत खेळणार आहे.