‘अँटी रेडिएशन मिसाईल ‘रुद्रम’ची यशस्वी चाचणी –
- भारताने हवाई दलाच्या (सुखोई) SU-30MKI या लढाऊ विमानामधून New Generation Anti Radiation Missile (NGARM)
रुद्रम-1 ची यशस्वी चाचणी केली.
- (डीफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO) संरक्षण संशोधन व विकास संस्थाने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राची चाचणी बंगालच्या उपसागरातील ओडिशाच्या किनाऱ्यावर घेण्यात आली.
- शत्रूच्या हवाई संरक्षणला उध्वस्त करण्यासाठी हवेतून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. ज्यामुळे भारतीय हवाई दलाच्या (IAF) लढाऊ विमानांना आणखी रणनीतिक क्षमता मिळेल.
- क्षेपणास्त्राचा पल्ला विमानाच्या उड्डाणाच्या उंचीवर अवलंबून आहे. 500 मीटर ते 15 किमी उंचीपासून हे डागले जाऊ शकते.
- याने 250 कि.मी. पर्यंत अंतरावरील किरणोत्सर्ग करणाऱ्या लक्ष्याचा वेध घेता येतो.
- रुद्रम-1 ची लांबी=5.5 M, वजन = 140 kg.
- क्षेपणास्त्रामध्ये INS-GPS (इनर्शिअल नॅव्हिगेशन सिस्टिम व ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) यांचा व अंतिम हल्ल्यासाठी पॅसिव्ह होमिंग हेडचा वापर केला आहे.
(पॅसिव्ह होमिंग हेड-
-या मध्ये प्रोग्राम केल्यानुसार विस्तृत कक्षेतील वारंवारतेच्या लक्ष्यांना शोधणे, ओळखणे व वेध घेण्यासाठी उपयुक्त)
- DRDO रुद्रम-2 व रुद्रम-3 वर ही काम करत आहे.
- DRDO ने यापूर्वी स्वदेशी विकसित ‘हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेइकल’ (HSTDV) व ‘हाय स्पीड एक्सपेंडेबल एरिअल टार्गेट’ (HEAT) ची यशस्वी चाचणी केली आहे.
संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)
अध्यक्ष – डॉ. द. सतीश रेड्डी
मुख्यालय – नवी दिल्ली