SKAO तर्फे उभारली जाणार जगातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक रेडिओ दुर्बीण
- फेब्रुवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या ‘Square Kilometre Array Observatory (SKAO)’ च्या परिषदेमध्ये जगातील सर्वात अत्याधुनिक, मोठी आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा वापर करून रेडिओ दुर्बीण या विकसित करण्याला मंजुरी देण्यात आली. चौरस किलोमीटर आकारामध्ये रेडिओ लहरींचे संकलन करणार्या दुर्बिणीचे अॅरे जोडून अतिसंवेदनशील दुर्बीण तयार केली जाणार आहे.
- ठिकाण – पश्चिम ऑस्ट्रेलियातील मुर्शीसन वाळवंट आणि दक्षिण आफ्रिकेतील कारू भागात या दुर्बिणीची उभारणी केली जाईल.
- केव्हा अस्तित्वात येईल? – SKAO दुर्बिणीचा पहिला टप्पा पुढील दहा वर्षांत पूर्ण होईल तर दुसर्या टप्प्याचे काम २०३५ मध्ये सुरू करण्यात येईल. या दुर्बिणीच्या निमित्ताने नवीन संशोधन आणि खगोलशास्त्राच्या नव्या युगाला प्रारंभ होणार आहे.
दुर्बिणीची रचना
- दक्षिण आफ्रिकेत १३० गोलाकार दुर्बिणी बसवण्यात येतील तर ऑस्ट्रेलियात एक लाख तीस हजार डायपोल आकाराच्या दुर्बिणी बसवण्यात येणार आहेत.
- या दुर्बिणीच्या माध्यमातून अवकाश तंत्रज्ञानाची दारे उघडली जाणार आहेत. याद्वारे आकाशातील तारे, दीर्घिका, धूमकेतू व अवकाशीय घटकातून उत्सर्जित होणार्या रेडिओ लहरींची एकत्रित नोंद करता येणार आहे. त्यामुळे ५० MHz ते २५ GHz वारंवारिता मानवी कक्षेत येणार आहे.
- या दुर्बिणीची रचना आणि इतर कार्ये SKAO मार्फत नियंत्रण केली जाणार आहेत
SKAO विषयी :
- रेडिओ खगोलशास्त्रात काम करणारी ही एक आंतर-शासकीय संघटना.
- मुख्यालय – ब्रिटन (यूके)
- सदस्य – दहा देश. ऑस्ट्रेलिया, इटली, कॅनडा, चीन, दक्षिण आफ्रिका, भारत, स्वीडन, न्यूझीलंड, नेदरलँड आणि ब्रिटन (यूके)
भारताची भूमिका :
- आधीपासूनच भारतीय शास्त्रज्ञ जगभरातील व्हिडिओ खगोलशास्त्र संशोधनातही कार्य आणि नेतृत्व करताना दिसतात.
- या दुर्बिणीच्या रचनेमध्ये आणि उभारणीमध्ये भारताची मध्यवर्ती भूमिका असणार आहे. SKAO साठी लागणारे ‘टेलिस्कोप मॅनेजमेंट सिस्टिम’चे प्रारूप भारताने सादर केले असून त्याला मंजुरी देखील मिळाली आहे.
- दुर्बिणी उभारणीच्या कामात भारत इतर देशांचे नेतृत्व करणार आहे. यामुळे याचा फायदा भारतीय उद्योगक्षेत्राला देखील होणार आहे.
- २०११-१२ मध्ये या दुर्बिणीची संकल्पना मांडण्यात आली. त्यानंतरच्या काळात या संघटनेत भारताने आपला सक्रिय सहभाग नोंदवला असून भारत या संघटनेचा सदस्य झाला आहे.