S-४०० हवाई संरक्षण यंत्रणा पंजाब सेक्टरमध्ये तैनात

S-४०० हवाई संरक्षण यंत्रणा पंजाब सेक्टरमध्ये तैनात

  • भारतीय वायुसेनेने (IAF) पश्चिम पंजाब सेक्टरमध्ये S-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचा पहिला ताफा तैनात केला.
  • हा ताफा पाकिस्तान आणि चीनच्या हवाई धोक्यांची काळजी घेईल.
  • सुमारे ३५००० कोटी रुपयांच्या करारानुसार भारताला रशियाकडून S-४०० हवाई संरक्षण प्रणाली प्राप्त झाली. ४०० किमीपर्यंत क्षमता असणाऱ्या या अत्याधुनिक प्रणालीचे एकूण पाच ताफे आहेत.
  • S-४०० क्षेपणास्त्र प्रणाली शत्रूची विमाने, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तसेच AWACS (Airborne Warning And Control System) विमानांविरुद्ध कार्य करेल.
  • जमिनीवरून हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची ही जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्रप्रणाली आहे. ४०० किमीच्या क्षेत्रातील सर्व प्रकारच्या लक्ष्यांना भेदण्याची क्षमता असणाऱ्या या प्रणालीला त्यामुळेच S-४०० हे नाव देण्यात आले आहे.
  • २००७ सालापासून रशियाने मॉस्कोच्या सुरक्षेसाठी ही प्रणाली तैनात केली आहे.

Contact Us

    Enquire Now