PANEX-२१

PANEX-२१

  • २०-२१ डिसेंबर २०२१ रोजी PANEX-२१ या बहुराष्ट्रीय आणि बहुसंस्थांचा समावेश असणार्‍या सरावाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले.
  • हे या सरावाचे तिसरे वर्ष आहे.
  • या सरावामध्ये बिम्स्टेक राष्ट्रांचे प्रतिनिधी, विषय तज्ज्ञ तसेच डॉ. सौम्या स्वामीनाथन (मुख्य शास्रज्ञ, WHO), डॉ. विनोद कुमार पॉल, (NIITI आयोग सदस्य) यासारख्या विविध तज्ज्ञांचा समावेश होता.

महत्त्वाचे मुद्दे

  • या सरावादरम्यान नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रभावी मानवतावादी मदत आणि प्रभावी आपत्ती निवारण कार्य यांवर चर्चा झाली.
  • BIMSTEC आपत्ती निवारण यंत्रणा स्थापण्याचीही शिफारस करण्यात आली.
  • BIMSTEC – Bay of Bengal Initiative for Multisectoral Technical and Economic Cooperation
  • स्थापना – ६ जून १९९७
  • सुरुवातीला बांग्लादेश (B), भारत (I), श्रीलंका (S), थायलंड (T) या राष्ट्रांमध्ये BIST-EC या नावाने स्थापना झाली होती. त्यानंतर डिसेंबर १९९७ मध्ये म्यानमार (M) तर २००४ मध्ये नेपाळ (N) आणि भूतान (B) यांचा समावेश करण्यात आला.  त्यामुळे २००४ मध्ये या प्रादेशिक गटाला BIMSTEC अर्थात Bay of Bengal Initiative for Multi Sectoral Technical and Economic Cooperation हे नाव देण्यात आले.
  • मुख्यालय – ढाका, बांग्लादेश

Contact Us

    Enquire Now