ED कडून बँकांना दिलासा

ED कडून बँकांना दिलासा

  • अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना नुकतेच ८,४४१.५० कोटी रुपयांची संपत्ती हस्तांतरित केली.
  • विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी व नीरव मोदी यांनी बँकांची फसवणूक केल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना जवळपास २२,५८५ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
  • या आर्थिक गुन्हेगारांच्या विरुद्ध असलेल्या मनीलॉन्डरिंग केसेसची चौकशी करताना ED ने १८,१७०.०२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.

अंमलबजावणी संचालनालय (ED)

  • १ मे १९५६ ला आर्थिक घडामोडी विभागांतर्गत परकीय चलन नियमन कायदा, १९७४ (FERA) याच्या अंमलबजावणीसाठी एक ‘अंमलबजावणी युनिट’ स्थापन झाले.
  • १९५७ मध्ये त्याचे नाव ‘अंमलबजावणी संचालनालय’ असे केले.
  • सध्या ED वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत येते.
  • ED चे मुख्य कार्य परकीय चलन व्यवस्थापन कायदा. १९९९ (FEMA) व मनीलॉन्डरिंग प्रतिबंधन कायदा (PMLA) या दोन कायद्यांच्या तरतुदीची अंमलबजावणी करणे आहे.
  • शिवाय फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८ अंतर्गत येणाऱ्या केसेस सांभाळणे.
  • तसेच FEMA च्या उल्लंघनासंदर्भात परकीय चलन व तस्करी प्रतिबंध कायदा, १९७४ (COFEPOSA) अंतर्गत प्रतिबंधात्मक अटकेची प्रायोजन करणे.
  • ED भरती तसेच पोलिस, महसूल, आयकर, कस्टम्स अशा अन्वेषण एजन्सीमधून त्यांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करते.
  • PMLA कायद्यासाठी केंद्र शासन उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांशी चर्चा करून एखाद्या सत्र न्यायालयास विशेष न्यायालय (PMLA – Court) म्हणून घोषित करू शकते.
  • या कोर्टाविरुद्ध अपील थेट उच्च न्यायालयात करता येते.

Contact Us

    Enquire Now