CORPAT : भारत-इंडोनेशिया नौदल सराव

 

 • CORPAT :  भारत-इंडोनेशिया नौदल सराव 

 

  • 30 व 31 जुलैला भारत आणि इंडोनेशियाच्या नौदलांमध्ये हिंदी महासागर प्रदेशात CORPAT(Coordinated Patrol )  सराव  पार पडला. या सरावाची ही 36 वी आवृत्ती होती.
  • या  सरावामध्ये  भारतीय बनावटीची गस्तीनौका INS  सरयू  इंडोनेशियाची KRI bung tomo या जहाजांनी भाग घेतला  होता.
  • दोन्ही नौदलांमध्ये सागरी सहकार्य वाढवणे आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये मैत्रीचे दृढ बंधन निर्माण करणे हा उद्देश सदर सरावाचा होता. हा सर्व प्रामुख्याने गस्ती (patrol) शी संबंधित आहे.
  • कोविड महामारीचा प्रादुर्भाव बघता  एकमेकांच्या संपर्कात न येता केवळ समुद्रात  (A non-contact, at sea only)  हा सराव घेण्यात आला.
  • सागर प्रकल्पाअंतर्गत [SAGAR- Security And Growth for All in the Region] हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर असणाऱ्या देशांशी सहकार्य करून या प्रदेशामध्ये  सुरक्षा वाढवण्याचा भारताचा मानस आहे.
  • 2015 मध्ये हिंदी महासागरातील आपल्या शेजाऱ्यांशी आर्थिक व संरक्षणात्मक सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सागर प्रकल्प सुरू केला.
  • 2002 पासून CORPAT  सरावाची सुरुवात झाली आणि तो वर्षातून दोनदा घेण्यात येतो. 

 

 • समुद्र शक्ती : भारत इंडोनेशियाच्या नौदलांमध्ये होणारा युद्ध अभ्यास 

 

 • गरुड शक्ती :  भारत इंडोनेशियाच्या सैन्यामध्ये होणारा भूदल युद्ध अभ्यास

Contact Us

  Enquire Now