११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन
- दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो.
- ११ जुलै १९८७ रोजी जगाने पाच अब्ज लोकसंख्येचा आकडा पार केल्यामुळे १९८९ पासून हा दिवस साजरा केला जातो.
- लोकांमध्ये कुटुंबनियोजन, लिंग समानता, दारिद्र्य, मातृ स्वास्थ्य, मानवी हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे हे हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाची सहस्रक विकास ध्येय आणि शाश्वत विकास ध्येय प्राप्त करण्यासाठी UNDP च्या सहाय्याला UNFPA (United Nations fund for population activities) ही संस्था कार्यरत आहे.
- UNFPA ही संस्था दरवर्षी जगभरातील लोकसंख्येचे आकडे गोळा करून त्यांचे विश्लेषण करून ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन’ हा अहवाल प्रकाशित करत असते.
- २०११ मधील लोकसंख्या आकडेवारी विचारात घेता भारताचा जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक होता. भारताचे एकूण लोकसंख्या १२१.०८ कोटी होती आणि ही लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १७.५ टक्के होती.
- सर्वाधिक लोकसंख्येचे प्रथम पाच देश : चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, नायजेरिया, बांगलादेश
- चीनने ३१ मे २०२१ रोजी आपल्या लोकसंख्याविषयक धोरणात बदल केला. पूर्वीचं दोन अपत्यांच्या मर्यादेचं धोरण रद्द केलं आणि एका जोडप्याला तीन अपत्यांची परवानगी दिली.
भारत आणि लोकसंख्या धोरण :
- जगात सर्वप्रथम कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम सुरू करणारा देश म्हणजे भारत. १९५२ मध्ये भारतामध्ये कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
- आत्तापर्यंत भारताची दोन लोकसंख्या धोरणे जाहीर करण्यात आली होती.
१. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण-१९७६ :
- लग्नाचे किमान वय स्त्रियांसाठी १८ वर्षे आणि पुरुषांसाठी २१ वर्षे करण्याची घोषणा.
- कुपोषण कमी करणे व स्त्री साक्षरता वाढवणे यावर भर.
- कुटुंब नियोजनासाठी वित्तीय मदत देण्याचा निर्णय.
- लोकसंख्येची मूल्य रुजवण्याचा लहान कुटुंबाच्या तत्त्वाचा प्रसार करण्यात आला.
- सहाव्या योजना अखेर जन्मदर २५ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- लोकसभेतील जागांचे वाटप करताना १९७१ ची जनगणना विचारात घेतली जाईल.
२. दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २०००:
- तातडीचे उद्दिष्ट :
- संततिनियमन, आरोग्य पायाभूत सुविधा, आरोग्य सेवकांची गरज भागविणे, आणि प्रजनन व बाल आरोग्य सेवा मिळविण्यासाठी एकात्मिक सेवा पुरविणे.
- मध्यवर्ती उद्दिष्ट :
- २०१० पर्यंत एकूण जननदर (TFR) पुन:स्थापनेच्या स्तरावर म्हणजेच २.१ वर आणणे व यासाठी धोरणात्मक अंमलबजावणी करणे. म्हणजेच एका जोडप्यामागे दोन मुले (हम दो, हमारे दो) या तत्त्वाचा प्रसार करणे.
III. दीर्घकालीन उद्दिष्ट :
- २०४५ पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे. ती अशा स्तरावर स्थिर करणे जिथे शाश्वत विकास शाश्वत आर्थिक वाढ व सामाजिक विकास होईल आणि पर्यावरण सुरक्षित राहील.