२०२० चा सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द म्हणून ‘आत्मनिर्भरता’ शब्दाची निवड

२०२० चा सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द म्हणून ‘आत्मनिर्भरता’ शब्दाची निवड

  • मागील वर्षीच्या नीती, मनोवृत्ती किंवा परिस्थिती प्रतिबिंबित करण्यासाठी ऑक्सफर्ड दरवर्षी एखाद्या शब्दाची निवड करते. याच पार्श्वभूमीवर ‘ऑक्सफर्ड लँग्वेजेस’ विभागाने २०२० चा हिंदी वर्ड ऑफ द इअर म्हणून ‘आत्मनिर्भरता’ या शब्दाची निवड केली आहे.
  • ‘आत्मनिर्भरता’ या शब्दाची निवड भाषा तज्ज्ञ कृतिक अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांच्या पॅनलने केली आहे. सांस्कृतिक महत्त्व असलेले शब्द आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या शब्दाची निवड यामध्ये केली जाते.
  • हा शब्द निवडताना सकारात्मक ऊर्जा आणि सर्वसमावेशता असणारा शब्द निवडण्यावर ऑक्सफर्डचा भर असतो. दरवर्षी अशा शब्दांची निवड केली जाते. २०१७ पर्यंत यामध्ये फक्त इंग्रजी शब्द असायचा. मात्र आता हिंदी शब्दाचादेखील समावेश करण्यात येतो.
  • कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अर्थव्यवस्थेला आणि लोकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. ‘आत्मनिर्भर’ या शब्दाद्वारे देशवासियांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तेव्हा सामान्य जनतेच्या तोंडीही ‘आत्मनिर्भरता’ हा शब्द आला.
  • समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींना हा शब्द भावला. कारण कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी तोच एक मार्ग आहे, हे सर्वांना पटले होते, असे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिवरामकृष्णन व्यंकटेश्वरन यांनी सांगितले आहे.
  • आत्मनिर्भर भारत योजना ही कोरोना काळात उत्पादन क्षेत्रात राबविण्यात आली. या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे कोविड-१९ च्या लसीची देशात निर्मिती करणे. प्रजासत्ताक दिनी, राजपथावर आत्मनिर्भर भारत अभियानाची रूपरेषा दाखवितानाचा चित्ररथ साकारण्यात आला होता. तो जैवतंत्रज्ञानावर आधारित होता. त्यात कोविड लस विकसन प्रक्रिया भारताने स्वबळावर केल्याचे दाखविण्यात आले होते.
  • अशा या लोकप्रिय शब्दासाठी अनेक प्रवेशिका आल्या होत्या. त्यांच्यामधून ‘आत्मनिर्भरता’ या शब्दाची निवड करण्यात आली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

आतापर्यंत ऑक्सफोर्ड शब्दकोशात समावेश झालेले हिंदी शब्द

  • २०२० – आत्मनिर्भरता
  • २०१९ – संविधान
  • २०१८ – नारी शक्ती
  • २०१७ – आधार.

Contact Us

    Enquire Now