१८५७ च्या उठावातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अंबाला येथे संग्रहालय

१८५७ च्या उठावातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अंबाला येथे संग्रहालय

  • १८५७च्या उठावातील हुतात्म्यांच्या सन्मानार्थ हरियाणा सरकारने अंबाला येथे स्मारक-संग्रहालय उभारण्याची घोषणा केली आहे.
  • उद्देश : ज्या वीरांचा उल्लेख ब्रिटिशांविरुद्धच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात नाही अशा वीरांच्या शौर्याला अमर करणे.
  • यामुळे स्वातंत्र्यलढ्यातील हरियाणाचे योगदान व अंबाला येथील बंडाच्या घटनांवर विशेष भर देण्यात येईल.

हरियाणातील उठाव

  • केंद्र : अंबाला
  • नेतृत्व : राव तुला राम, गफ्फुर अली, धतू सिंग, नाहर सिंग
  • महत्त्वाच्या लढाया : सिरमा, सोनीपत, रोहतक, हिस्सार येथे महत्त्वाच्या लढाया. प्रसिद्ध चोरमारची लढाई सिरसा येथे लढली गेली.
  • उठावावरील पुस्तक : द रिव्हॉल्ट ऑफ १८५७ इन हरियाणा (के. सी. यादव)

१८५७ चा उठाव

कारणे

१) आर्थिक

  • दोषपूर्ण महसूल पद्धती
  • इनाम कमिशन
  • शेतीचे व्यापारीकरण
  • आर्थिक निस्सारण

२) राजकीय

  • दत्तकविधान नामंजूर
  • पेन्शन, पदव्या रद्द

३) सामाजिक

  • सती बंदी, विधवा पुनर्विवाह ख्रिश्चन मिशनरी, धार्मिक कर, काळे-गोरे भेद

४) लष्करी

  • भेदभावपूर्ण वागणूक, वेल्लोर शिपायांचा उठाव, हिंदी सैनिकातील असंतोष, सुभेदारपेक्षा उच्च पद नाही

५) तत्कालिक

  • रॉयल एनफिल्डच्या काडतुसास गाय व डुकरांची चरबी

१८५७ चा उठाव, नेतृत्व, ब्रिटिश नेतृत्व

क्र उठाव नेतृत्व ब्रिटिश नेतृत्व
१) बराकपूर (२९ मार्च १८५७) मंगल पांडे सुरुवात
२) मीरत शिपाई (१२ मे) सर्व शिपाई- मीरत दिल्लीवर ताबा
३) दिल्ली जनरल बख्तखान जॉन निकोल्सन (ज. हडसन मृत्यू
४) लखनौ बेगम हजरत महल कॅम्बेल
५) झाँशी राणी लक्ष्मीबाई ह्यू रोज
६) कानपूर नानासाहेब कॅम्बेल, व्हू व्हीलर
७) बरेली (रोहिलखंड) बहादूर खान कॅम्बेल, विंसेट ऑथर
८) जगदिशपूर (बिहार) कुंवरसिंह विलियम टेलर
९) फैजाबाद (अवध) मौलवी अहमदुल्ला जनरल रेनर्ड
१०) ग्वाल्हेर तात्या टोपे ह्यू रोज
११) मद्रास गुलाम गौस, सुलतान बक्श
१२) आंध्रप्रदेश संन्याशी भूपती, चिंता भूपती

महाराष्ट्र –

१) सातारा – रंगो बापूजी गुप्ते

२) कोल्हापूर – रामजी शिरसाठ

३) खान्देश – खर्जासिंग

४) सातपुडा – शंकरशाह

५) बेळगाव – महिपाल सिंग

६) पेठ – भगवंतराव निळकंठराव

७) जमखिंडी – राजे आप्पासाहेब पटवर्धन

८) नरनुद – बाबासाहेब भावे

९) सोरापूर – राजा वैंकप्पा नाईक बळवंत बेहरी

१०) मुधोळ – बेरड

उठावाच्या वेळी ब्रिटिशांना मदत करणारे

१) काश्मिरचा राजा गुलाबसिंह

२) सालारजंग

३) दिनकरराव

४) इंदोरचे होळकर (तटस्थ)

५) कपूरशहा

६) भोपाळचा नवाब

७) ग्वाल्हेरचे शिंदे

८) हैद्राबादचा निजाम

९) टेहरी – टिकमगडचे राजे

१८५७ च्या उठावासंबंधी मते

१) विनायक सावरकर – पहिले स्वातंत्र्ययुद्ध

२) पट्टाभिसितारामय्या – भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम

३) बेंझामिन डिझरायली, अशोक मेहता – राष्ट्रीय विद्रोह

४) पंडित जवाहरलाल नेहरू – जनआंदोलन

५) जे. जी. मिडले – गोऱ्या विरुद्ध काळ्यांचा संघर्ष

६) टी. आर. होल्म्स – रानटीपणा आणि सभ्यता यांतील संघर्ष

७) स्टॅन्ले वॉलपर्ट – लष्करी बंडापेक्षा काहीशी अधिक परंतु प्रथम स्वातंत्र्यापेक्षा बरीच कमी

परिणाम :

१) भारतमंत्री हे नविन पद (पहिला -लॉर्ड स्टॅन्ले)

२) भारताचा गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय बनला (पहिला – कॅनिंग)

३) सैन्यात ब्रिटिशांची भरती वाढविली (१:२)

४) हिंदू-मुस्लिमात फूट पाडण्यासाठी तोड आणि फोडा निती 

५) राणीचा जाहिरनामा (१३५८)

Contact Us

    Enquire Now