हाँगकाँगमधील लोकशाहीवादी दैनिक ‘ॲपल डेली’ बंद

हाँगकाँगमधील लोकशाहीवादी दैनिक ‘ॲपल डेली’ बंद

  • २०१९ मध्ये चीनने पारित केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार हाँगकाँगमधील ‘ॲपल डेली’ या लोकशाहीवादी दैनिकाने आपले वृत्तपत्र बंद केले.

पार्श्वभूमी

  • हाँगकाँगचे नियंत्रण चीनकडे आल्यापासून तिथे पद्धतशीरपणे लोकशाही संपविण्यात आली.
  • चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षे होत आहे, त्याचीच या घटनेला पार्श्वभूमी
  • तसेच रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्सच्या वार्षिक प्रेस स्वातंत्र्य क्रमवारीत २००२ मध्ये १८व्या स्थानापासून ते यंदाच्या ८०व्या स्थानापर्यंत सतत घसरण

वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय :

  • ॲपल डेलीवर छापा टाकून संस्थापक लाय यांना अटक तसेच आठवड्यापूर्वी त्यांची २३ लाख रुपयांची संपत्तीही गोठविण्यात आली.
  • परिणामी, पगारासाठी पैशाची कमतरता व कर्मचाऱ्यांच्या छळाची भीती या कारणांमुळे वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

परिणाम 

  • मीडियाच्या स्वातंत्र्यांवर गंभीर परिणाम
  • व्यापारी केंद्र म्हणून हाँगकॉगची प्रतिष्ठा कमी होईल.

ॲपल डेली वृत्तपत्र 

स्थापना: १० जून १९९५

संस्थापक : जिमी लाय

  • २० जून १९९५ च्या पहिल्या अंकानंतर दोनच वर्षांनी ब्रिटनकडून हाँगकाँग चीनच्या नियंत्रणाखाली आले.
  • लोकशाहीचे समर्थन तर चीनच्या दडपशाहीला पहिल्यापासूनच झुगारणारे दैनिक.
  • एरवी ८० हजार प्रतींचा खप असणाऱ्या ॲपल डेलीच्या २३ जून २०२० च्या शेवटच्या अंकांचा खप १० लाख इतका होता.

चीनचा हाँगकाँगमधील राष्ट्रीय सुरक्षा कायदा:

  • कायद्यातील कलम ४३ अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षेस धोका या कारणावरून संशयितांची विना वॉरंट चौकशी करण्याचा अधिकार आहे.
  • इंटरनेटवर निर्बंध व देखरेख ठेवण्याचादेखील हाँगकाँग पोलि‌सांना अधिकार.

 कायद्यातील तरतूद व शिक्षा :

क्र. तरतूद उल्लंघन केल्यास शिक्षा
अ) संशयित व्यक्तीने आपली कागदपत्रे पोलिसांकडे सोपवावीत. १ लाख हाँगकाँग डॉलर्स दंड आणि ६ महिने कारावास
ब) प्रकाशक, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्सनी राष्ट्रीय सुरक्षेस धोका असणारे छापील किंवा ब्रॉडकास्ट मेसेज हटविणे. १ वर्षाचा कारावास आणि दंड

Contact Us

    Enquire Now