स्टीव्हन वेनबर्ग

स्टीव्हन वेनबर्ग

  • जन्म – ३ मे १९३३ (न्यूयॉर्क)
  • मृत्यू – २३ जुलै २०२१
  • विश्वातील मूलभूत कणांच्या वर्गीकरणाचा पाया असलेल्या प्रमाणित सिद्धांतामधील दोन महत्त्वाची बले ज्यांनी शोधून काढली, ते स्टीव्हन वेनबर्ग यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.
  • वेनबर्ग हे ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक होते.
  • विज्ञानातील काही वैचित्र्यपूर्ण संकल्पना लोकांपुढे मांडण्याची कला त्यांच्यात होती.
  • ‘द फर्स्ट थ्री मिनिट्स – अ मॉडर्न व्ह्यू ऑफ द युनिव्हर्स’ हे पुस्तक त्यांनी लिहिले.
  • १९७६च्या सुमारास वेनबर्ग यांनी आधी जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांच्या गॉज सिद्धातांचा वापर करून कमकुवत बलातील क्रिया तपासल्या व अखेर नवीन सिद्धांत मांडताना न्यूट्रिनो व न्यूट्रॉन यांच्यासारख्या विद्युत उदासिनीकरण क्रियांचा उल्लेख करून डब्ल्यू व झेड बोसॉन तसेच फोटॉन यांच्यातला संबंध प्रस्थापित केला.
  • त्यातून असे निष्कर्ष काढण्यात आले की, उच्च ऊर्जा पातळीवर विद्युत चुंबकीय व इतर कमकुवत बले एकसारखीच असतात.
  • १९६७ मध्ये वेनबर्ग यांनी ‘अ मॉडेल ऑफ लेप्टॉन’ हा शोधनिबंध लिहिला.
  • त्याचवेळी पाकिस्तानचे अणुवैज्ञानिक डॉ. अब्दुल सलाम यांनी असेच संशोधन केले होते. त्यांच्या प्रारूपाला ‘वेनबर्ग सलाम’ प्रारूप म्हणतात.
  • प्रमाणित सिद्धांताचा पाया घातल्याने त्यासाठी १९७९ला वेनबर्ग, सलाम व शेल्डन ली ग्लॅशहाऊ यांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  • १९७२ मध्ये त्यांनी विश्वरचना शास्त्राचा अभ्यास सुरू केला होता.

Contact Us

    Enquire Now