सुशासन निर्देशांक, २०२१

सुशासन निर्देशांक, २०२१

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सुशासन दिनाच्या औचित्याने २५ डिसेंबर रोजी गुड गव्हर्नन्स इंडेक्स (सुशासन निर्देशांक) २०२१ जाहीर करण्यात आला.
  • एप्रिल २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या चँडलर सुशासन निर्देशांकानुसार भारत ०.५१६ गुणांसह ४९व्या स्थानावर होता.
  • देशातील सर्व राज्यांमध्ये प्रशासनाच्या गुणवत्तेनुसार त्यांची यादी दरवर्षी केंद्र सरकारकडून तयार केली जाते.
  • या यादीनुसार २०१९ च्या तुलनेत २० राज्यांनी त्यांचा GGI दर्जा सुधारला असून गुजरात राज्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
  • ही यादी तयार करण्यासाठी केंद्राकडून एकूण १० क्षेत्र आणि त्यातील २८ निर्देशकांची तपासणी केली जाते.
  • गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांनी १० क्षेत्रांच्या संयुक्त श्रेणीच्या गुणवत्तेनुसार अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

क्षेत्रनिहाय व संयुक्त श्रेणीत अव्वल असलेली राज्ये पुढीलप्रमाणे

क्र क्षेत्रे गट-अ गट-ब ईशान्येकडील व डोंगराळ प्रदेशातील

राज्ये

केंद्रशासित 

प्रदेश

शेती आणि जोडधंदे आंध्र प्रदेश मध्य प्रदेश मिझोरम दादरा, नगर, हवेली
व्यापार आणि उद्योग तेलंगणा उत्तर प्रदेश जम्मू आणि काश्मिर दमण आणि दीव
मनुष्यबळ विकास पंजाब ओदिशा हिमाचल प्रदेश चंदीगड
सार्वजनिक आरोग्य केरळ पश्चिम बंगाल मिझोराम अंदमान आणि निकोबार
सार्वजनिक सोयीसुविधा गोवा बिहार हिमाचल प्रदेश अंदमान आणि निकोबार
आर्थिक प्रशासन गुजरात ओदिशा त्रिपुरा दिल्ली
समाज कल्याण तेलंगणा छत्तीसगड सिक्कीम दादर. न. हवेली
न्यायव्यवस्था व सार्वजनिक सुरक्षा तमिळनाडू राजस्थान नागालँड चंदीगड
पर्यावरण केरळ राजस्थान मणिपूर दमण आणि दिव
१० नागरिक केंद्रीय प्रशासन हरियाणा राजस्थान उत्तराखंड दिल्ली
संयुक्त गुजरात मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश दिल्ली

Contact Us

    Enquire Now