सुरेखा सिक्री

सुरेखा सिक्री

जन्म : १९ एप्रिल १९४५ (दिल्ली)

मृत्यू : १६ जुलै २०२१ (मुंबई)

जीवनपरिचय :

  • सहकलावंतांनी विविध भूमिका केल्या तरी काही व्यक्तिरेखाच प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात. पण सुरेखा सिक्री याला अपवाद ठरल्या.
  • सुरेखा सिक्री यांचे वयाच्या ७६व्या वर्षी निधन झाले.
  • सुरेखा सिक्री या २००८ पासून ते २०१६ अशी तब्बल नऊ वर्षे ‘दादीसा’ म्हणून घरोघरी पोहोचल्या.
  • ‘मम्मो’ सिनेमातील आजीची भूमिका, अलिकडील ‘बधाई हो’ सिनेमातील आजीची भूमिका तसेच ‘बालिका वधु’ या अनेक भारतीय भाषांत डब झालेल्या हिंदी मालिकेतील ‘दादीसा’ ही आजीचीच पण प्रमुख भूमिका यांतून ‘आजी’चे निरनिराळे पैलू त्यांनी दाखवले.
  • १९७१ मध्ये त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून प्रशिक्षण घेतले.
  • सात-आठ वर्षे सुरेखा सिक्री यांनी एनएसडी रेपेर्हरी कंपनीत रंगभूमीसाठीच काम केले.
  • त्यांच्या या रंगभूमीसाठीच्या योगदानाबद्दल १९८९ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  • १९७८ मध्ये मुंबईला आल्यावर “किस्सा कुर्सी का” या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.
  • राजो या  ‘तमस’ मधील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९८८ साली सुरेखा सिक्री यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
  • सईद मिर्झा दिग्दर्शित ‘सलीम लंगडे पे मत रो’ प्रकाश झा दिग्दर्शित ‘परिणती’ मणी कौल दिग्दर्शित ‘नज़र’ या सिनेमामधून त्या प्रेक्षकांसमोर आल्या.
  • श्माम बेनेगल दिग्दर्शित ‘मम्मो’ या सिनेमातील फेय्याजीच्या भूमिकेसाठी दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
  • टीव्ही मालिकाविश्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या टेली ॲवॉर्डनेही सुरेखा सिक्री यांचा गौरव करण्यात आला होता.

 

पुरस्कार

 

  • २०१९ – फिल्मफेअर पुरस्कार – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – बधाई हो
  • २०१८ – राष्ट्रीय पुरस्कार – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – बधाई हो
  • १९९४ –  राष्ट्रीय पुरस्कार – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – मम्मो
  • १९८७ – राष्ट्रीय पुरस्कार – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – तमस
  • २०१६ – भारतीय दूरदर्शन अकादमी पुरस्कार – नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – एक था राजा एक थी राणी – मालिका

Contact Us

    Enquire Now