सुंदरलाल बहुगुणा

सुंदरलाल बहुगुणा

  • जन्म : ९ जानेवारी १९२७ (मरोडा, उत्तराखंड)
  • निधन : २१ मे २०२१ (वय – ९४ वर्षे)
  • पर्यावरणवादी, चिपको आंदोलनाचे प्रणेते, गांधीजींचे अनुयायी.
  • हिमालयाचे रक्षक म्हणून ओळख.
  • त्यांचे वडील अंबादत्त बहुगुणा हे टिहरी संस्थानातील वन अधिकारी होते.

कार्ये :

  • अस्पृश्यतेविरोधी लढा
  • १९६५ ते ७० दरम्यान गावातील स्रियांना एकत्र करून दारुधंद्याविरोधात आवाज उठविला.
  • वयाच्या तेराव्या वर्षी श्री. देव सुमन यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमास सुरुवात.
  • झाडे व जंगलांचे भाग वन कंत्राटदारांपासून बचाव करण्यासाठी २६ मार्च १९७४ रोजी उत्तरप्रदेशात चिपको आंदोलनाची सुरुवात.
  • चिपको चळवळीत आणि सर्वसाधारणपणे पर्यावरणासाठीचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली घोषणा ‘पर्यावरणशास्र हिच स्थायी अर्थव्यवस्था.’
  • या चळवळीचा परिणाम म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधींनी १५ वर्षे वृक्षतोड बंदीचा निर्णय घेतला.
  • सुंदरलाल बहुगुणा यांच्या प्रेरणेनेचे ८ सप्टेंबर १९८३ मध्ये पांडुरंग हेगडे यांनी कर्नाटकमध्ये अप्पीको चळवळ सुरू केली.
  • टिहरी धरणाच्या उभारणीला त्यांनी सत्याग्रह व उपोषण पद्धतीचा अवलंब करून त्यास विरोध दर्शविला.
  • २००१ मध्ये टिहरी धरणाचे काम सुरू झाले आणि २१ एप्रिल २०२१ ला बहुगुणा यांना अटक करण्यात आली.
  • ८४ दिवस टिहरी आंदोलन त्यांनी चालू ठेवले.
  • ‘धरण नको, धरणाने पर्वतांना संपवले जाईल,’ अशी भूमिका त्यांनी टेहरी धरणाच्या उभारणीवेळी मांडली, यासाठीच त्यांनी भगिरथीच्या काठावर उपोषणही केले.

पुरस्कार :

  • १९८१ – पद्मश्री पुरस्कार जाहीर, मात्र त्यांनी तो नाकारला.
  • १९८७ – चिपको चळवळीसाठी राईट लाईव्हलीहूड पारितोषिक
  • १९८६ – रचनात्मक कार्याबद्दल जमनालाल बजाज पारितोषिक
  • १९८९ – आयआयटी, रुरकीने सन्माननीय डॉक्टर ऑफ सोशल सायन्सेसने गौरवांकित केली.
  • २००९ – पर्यावरण रक्षणासाठी पद्मविभूषण

पुस्तके :

  • इंडियाज न्व्हायन्मेॆंट: मिथ अँड रिअॅलिटी- सुंदरलाल बहुगुणा, मेधा पाटकर आणि वंदना शिवा
  • एन्व्हायर्न्मेंट क्रायसिस ॲन्ड ह्युमन्स ॲट रिस्क : प्रायोरिटीज फॉर ॲक्शन- सहलेखक राजीव के सिन्हा
  • भू प्रयोगमें बुनियादी परिवर्तन की ओर : धरती की पुकार (हिंदी)- जेम्स, जॉर्ज अल्फ्रेड (२०१३)
  • इकॉलॉजी इज पर्मनंट इकॉनॉमी : द ॲक्टिव्हिजम ॲन्ड एन्व्हायन्मेंटालिझम ऑफ सुंदरलाल बहुगुणा- अल्थानी स्टेट युनिव्हर्सिटी, न्युयॉर्क

Contact Us

    Enquire Now