साहित्य अकादमी पुरस्कार – २०२१

साहित्य अकादमी पुरस्कार – २०२१

  • २४ भाषांसाठी दिला जातो.
  • सुरुवात – १९५५
  • स्वरूप – २००९ पासून १ लाख रु. रोख व ताम्रपट (हा ताम्रपट भारतातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांनी तयार केला आहे.)

मराठी भाषेसाठीचा पुरस्कार २०२१

  • किरण गुरव – यांच्या “बाळूच्या अवस्थांतराची डायरी” या कथासंग्रहाला मराठी भाषेत आतापर्यंत फक्त १९५७ साली हा पुरस्कार दिला नाही.

कोकणी भाषेसाठी दिलेले पुरस्कार २०२१

  • कोकणीमध्ये संजय वेंरेकर यांच्या ‘रक्तचंदन’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा सन्मान
वर्ष लेखक/लेखिका साहित्यकृती
२०१४ जयंत नारळीकर चार घरातले माझे विश्व
२०१५ अरुण खोपकर चलत् चित्रव्यूह
२०१६ आसाराम लोमटे आलोक (लघुकथासंग्रह)
२०१७ श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्ही (काव्यसंग्रह)
२०१८ डॉ. म. सु. पाटील सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध (समीक्षाग्रंथ)
२०१९ अनुराधा पाटील कदाचित अजूनही (कथासंग्रह)
२०२० नंदा खरे उद्या (कादंबरी)
२०२१ १) किरण गुरव

२) संजय वेंरेकर

बाळूच्या अवस्थांतराची डायरी (कथासंग्रह)

रक्तचंदन (कथासंग्रह)

२०२१ सालचे काही प्रमुख भाषांमधील पुरस्कार प्राप्तकर्ते

भाषा लेखक/लेखिका साहित्यकृती
१) मराठी किरण गुरव बाळूच्या अवस्थांतराची डायरी (कथासंग्रह)
२) कोकणी १) सुमेधा कामत देसाय

२) श्रद्धा गरड

(लघुकादंबरी – सूमीचे कॉटन्ग्री)

कवितासंग्रह – काव्य करमाळ

३) इंग्रजी नमिता गोखले ‘थिंग्ज टु लिव्ह बिहाइंड’
४) हिंदी दयाप्रकाश सिन्हा सम्राट अशोक (नाटक)
५) संस्कृत विघ्नेवरीप्रसाद मिश्र
६) पंजाबी खालिद हुसैन (कहानी संग्रह) सुला दा सालण
  • यंदाच्या साहित्य अकादमी सन्मानामध्ये सात काव्यसंग्रह, पाच कथासंग्रह, दोन कादंबऱ्या, दोन नाटके, एक चरित्र, एक आत्मकथन, एक महाकाव्य, आणि टीका अशा गटातील पुस्तकांचा समावेश

बालसाहित्य पुरस्कार

  • दरवर्षी २४ भाषांमधील साहित्यकास दिला जातो.
  • स्वरूप – ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह

२०२१चे बालसाहित्य पुरस्कार

  • संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार देण्यात आले.

युवा पुरस्कार

  • ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या साहित्यिकांना दिला जातो.
  • २४ भाषांमधील साहित्यिकांना
  • स्वरूप – ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह

२०२१ चे युवा पुरस्कार

  • प्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीला युवा साहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार

  • साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचा महत्त्वाचा पुरस्कार
  • २४ भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. (संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील २२ व इंग्रजी व राजस्थानी)
  • स्थापना – १२ मार्च १९५४
  • मुख्यालय – दिल्ली
  • पहिले अध्यक्ष – पंडित जवाहरलाल नेहरू
  • सध्याचे अध्यक्ष – चंद्रशेखर कंबार
  • २४ भाषांसाठी एकूण ५ प्रकारांत पुरस्कार दिला जातो.
  • १) साहित्य अकादमी पुरस्कार – रचनात्मक लिखाणासाठी
  • २) भाषा सन्मान पुरस्कार
  • ३) अनुवादासाठी पुरस्कार
  • ४) बालसाहित्य पुरस्कार
  • ५) युवा पुरस्कार

Contact Us

    Enquire Now