सातपुडा व्याघ्र प्रकल्पास नॅटवेस्ट अर्थ हिरोझ्‌ पुरस्कार – २०२१

सातपुडा व्याघ्र प्रकल्पास नॅटवेस्ट अर्थ हिरोझ्‌ पुरस्कार – २०२१

  • मध्यप्रदेश राज्यातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पास सर्वोत्तम व्यवस्थापनासाठी अर्थ गार्डियन श्रेणीतील नॅटवेस्ट अर्थ हिरोझ पुरस्कार २०२१ प्राप्त झाला आहे.

नॅटवेस्ट अर्थ हिरोझ पुरस्कार :

  • सुरुवात : २०११
  • पुरस्कार देणारी संस्था : RBS (अ नॅटवेस्ट ग्रुप कंपनी)
  • उद्देश : अशा व्यक्ती आणि संस्थांना मान्यता आणि सन्मान मिळवून देणे जे पर्यावरणाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी अपवादात्मक मेहनत करतात.
  • निवड : प्रख्यात ज्युरी; वन्यजीव संवर्धन, जैव-विविधता व्यवस्थापन, विज्ञान, सरकार, मीडिया आणि नॅटवेस्ट ग्रुप इ. क्षेत्रांतील तज्ज्ञ

श्रेणी :

१) नॅटवेस्ट ग्रुप अर्थ हिरो ॲवॉर्ड

२) नॅटवेस्ट ग्रुप अर्थ गार्डियन ॲवॉर्ड

३) नॅटवेस्ट ग्रुप ‘सेव्ह दी स्पिशीज्’ ॲवॉर्ड

४) नॅटवेस्ट ग्रुप इन्स्पायर ॲवॉर्ड

५) नॅटवेस्ट ग्रुप ‘ग्रीन वॉरियर’ ॲवॉर्ड

सातपुडा व्याघ्र प्रकल्प :

  • स्थापना : २०००
  • स्थान : होशंगाबाद, मध्यप्रदेश, नर्मदा नदीच्या दक्षिणेस आहे.

क्षेत्रफळ :

अ) कोर झोन : १३३९.२६ किमी²

ब) बफर झोन : ७९४.०४ किमी²

क) एकूण : २१३३.३० किमी²

वन्यप्राणी : वाघ, काळवीट, बिबट्या, इंडियन गौर, मलबार जायंट गिलहरी, स्लॉथ बिअर इ.

पक्षी : मध्यप्रदेशचा राज्य पक्षी पॅराडाइज फ्लायकेचरसह अनेक स्थलांतरित पक्षी तसेच मलबार पाईड हॉर्नबिल, मलबार व्हिसलिंग थ्रश इ.

पुरातात्त्विक महत्त्व : १५०० ते १०००० वर्षे जुन्या चित्रांसह असणारे रॉक शेल्टर्स ज्यावर हत्ती, सिंह, वाघ, पेंगोलिन यांचे अत्यंत दुर्मिळ चित्रण केले आहे.

तीन संरक्षित क्षेत्रांचा समावेश :

 

अ) सातपुडा राष्ट्रीय उद्यान

ब) बोरी अभयारण्य

क) पंचमढी अभयारण्य

इतर : २० मे २०२१ रोजी सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

Contact Us

    Enquire Now