सर्वाधिक गोलच्या स्पर्धेत मेस्सीपेक्षा छेत्री सरस

सर्वाधिक गोलच्या स्पर्धेत मेस्सीपेक्षा छेत्री सरस

    • भारताचा खेळाडू सुनील छेत्रीने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या स्पर्धेत फुटबॉलचा स्टार लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे.
    • सध्या खेळत असलेल्या खेळाडूतील गोलच्या क्रमवारीत छेत्री आता ख्रिस्तियानो रोनाल्डोपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. छेत्रीला सार्वकालिक सर्वाधिक आंतराराष्ट्रीय गोल केलेल्या खेळाडूंच्या टॉप टेन क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी एक गोल हवा आहे.
    • विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या लढतीत छेत्रीच्या दोन गोल्समुळे भारताने २-० अशी बाजी मारली.
    • छेत्रीचे आता एकंदर ७४ गोल्स झाले आहेत, तर मेस्सीचे आंतरराष्ट्रीय गोल्स ७२ आहेत. रोनाल्डो १०३ गोल्ससह अव्वल स्थानावर आहे.
    • छेत्रीने या क्रमवारीत स्थान मिळवताना मेस्सीला दोन गोल्सनी; तर अमिरातीच्या अली माबखौत याला एका गोलने मागे टाकले आहे.
    • मेस्सीने त्याचा ७२वा आंतरराष्ट्रीय गोल चिलीविरुद्धच्या विश्वकरंडक पात्रता लढतीत केला होता; तर माबखौतने त्याचा अखेरचा गोल मलेशियाविरुद्ध केला होता.

 

सर्वाधिक गोल असणाऱ्या खेळाडूंची क्रमवारी

नाव देश गोल
रोनाल्डो पोर्तुगाल १०३
सुनील छेत्री भारत ७४
अली माबखौत अमिराती ७३
लिओनेल मेस्सी अर्जेंटिना ७२
रॉबर्ट-लेवांदोवस्की पोलंड ६६

Contact Us

    Enquire Now