सतीश काळसेकर

सतीश काळसेकर

  • जन्म : १९४३ (वेंगुर्ले सिंधुदुर्ग)
  • मृत्यू : २४ जुलै, २०२१ (पुणे)

जीवनपरिचय

  • मराठीतील प्रसिद्ध कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिक आणि मार्क्सवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचे निधन झाले.
  • ते ७८ वर्षांचे होते.
  • १९७१ साली त्यांचा ‘इंद्रियोपनिषद’ हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला.
  • महाविद्यालयाच्या नियतकालिकातून नवाकाळ, मराठा यासारख्या वर्तमान पत्रातूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या.
  • त्यांनी देशी-विदेशी भाषांतील अनेक कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद केले होते.
  • तसेच हिंदी, बंगाली, मल्याळम्‌, इंग्रजी, पंजाबी यांसह अन्य भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कवितांचे अनुवाद झाले आहेत.
  • त्यांच्या कवितेचा गाभा महानगरीय जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगात येणारे उत्कट भावनात्मक अनुभव हा होता.
  • मराठी प्रकाशनाच्या क्षेत्रातील लोकवाङ्मय ग्रह, मुंबई या प्रकाशन संस्थेच्या संपादनाचे कार्य त्यांनी केले होते.
  • राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे ते सदस्यदेखील होते.
  • काळसेकर यांनी मागोवा, तात्पर्य, लोकवाङ्मय, तापसी, चक्रवर्ती आणि आपले वाङ्मय वृत्त इत्यादी नियतकालिकांची संपादकीय जबाबदारी सांभाळली होती.

कवितासंग्रह

  • १९७१ – इंद्रियोपनिषद
  • १९८२ – साक्षात्
  • १९९७ – विलंबित
  • २०११ – नव्या वसाहतीत, अरुण कमल यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद

गद्य लेखन

  • २०१० – वाचणाऱ्यांची रोजनिशी
  • २०१५ – पायपीट
  • मी भयंकराच्या दारात उभा आहे. (नामदेव ढसाळ यांची कविता, संपादन – प्रज्ञा दया पवारसह २००७)
  • आयदान : सांस्कृतिक ठेवा (संपादन – सिसिलिया) (कार्व्हालोसह, २००७)
  • निवडक अबकडई (संपादन – अरुण शेवतेसह २०१२)

मिळालेले पुरस्कार

  • १९७७ – सोव्हिएल लँड नेहरू पारितोषिक
  • १९९७ – लालजी पेंडसे पुरस्कार
  • १९९८ – बहिणाबाई पुरस्कार कवी
  • १९९८ – कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार
  • १९९८ – महाराष्ट्र साहित्य परिषद
  • १९९९ – महाराष्ट्र शासन पुरस्कार
  • २००६ – कैफी आझमी पुरस्कार
  • २०१०-११ – महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार
  • २०१३ – साहित्य अकादमी पुरस्कार
  • २०१८ – महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार

Contact Us

    Enquire Now