संजय चक्रवर्ती

संजय चक्रवर्ती

जन्म – १९४२

निधन – ३ एप्रिल २०२१ 

 एकापेक्षा एक सरस नेमबाज घडवणारे व ४० वर्षांच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव असलेले द्रोणाचार्य.

  • संजय चक्रवर्ती हे मूळचे उत्तर प्रदेशचे होते. ते वडिलांच्या भारतीय रेल्वेतील नोकरीमुळे मुंबईत आले. 
  • सेना दलात दाखल झाल्यावर त्यांच्या नेमबाजीच्या कारकिर्दीला सुरुवात. 

स्पर्धा :

  • वयाच्या तिसाव्या वर्षी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहभाग 
  • दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व 

प्रशिक्षकपदाची कारकीर्द:

  • ज्या काळात नेमबाजीसाठी पुरेशी सराव केंद्र, साधनसामग्री उपलब्ध नव्हती त्यावेळी चक्रवर्ती सरांनी नेमबाजांना मार्गदर्शन केले. 
  • खेळाशी खेळाडूचे नाते, खेळाडूंची वागणूक कशी असावी याचीही शिकवण ते देत. 
  • गगन नारंग यांच्या पुण्यातील ‘गन फॉर ग्लोरी’ अकादमी किंवा अन्य शिष्यांच्या अकादमींमध्ये नेमबाजांना मार्गदर्शन. 
  • स्वतःची अकादमी नाही तसेच ते शिष्यांकडून गुरुदक्षिणाही घेत नसत. 

शिष्य:

  • लंडन ऑलिंपिक ब्रॉंझ पदक विजेते गगन नारंग, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स नेमबाज अंजली भागवत, सुमा सिरूर, आयोनिका पॉल, दीपाली देशपांडे इत्यादी. 

पुरस्कार:

अ) द्रोणाचार्य पुरस्कार (केंद्रीय क्रीडा मंत्रालय) 

ब) दादोजी कोंडदेव पुरस्कार (महाराष्ट्र शासन)

Contact Us

    Enquire Now