शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना ‘रिझर्व्ह’कडून रद्द

शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना ‘रिझर्व्ह’कडून रद्द

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार ९८ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम विमा महामंडळाकडून प्राप्त होईल.
  • बँकेच्या एकूण १४ शाखा असून ९५ हजार खातेदार आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत पुरेसे भांडवल नसून या बँकेकडून बॅकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या तरतुदींचे पालन करण्यात आले नाही.
  • बँकेला यापुढे बॅंकिंग व्यवसाय करण्यास परवानगी दिल्यास जनतेच्या हितावर परिणाम होईल. त्यामुळे बॅंकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • परवाना रद्द झाल्यामुळे तरलता प्रक्रिया सुरू झाल्यास, ‘डीआयसीजीसी’ कडून ठेवीदार खातेदारांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
  • रिझर्व्ह बँकेच्या महाराष्ट्र राज्याच्या टास्क फोर्स समितीचे सदस्य असलेल्या महाराष्ट्र राज्य अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी बँकेचा परवाना रद्द करावा, अशी मागणी टास्क फोर्स समितीने केली होती.

Contact Us

    Enquire Now