शहरी नद्यांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी रिव्हर सिटी अलायन्स

शहरी नद्यांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी रिव्हर सिटी अलायन्स

  • जलशक्ती मंत्रालय आणि गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने रिव्हर सिटीज अलायन्स (RCA) लॉन्च केले.
  • भारतातील शहरी नद्यांसाठी शाश्वत व्यवस्थापनासाठी कल्पना, चर्चा आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ म्हणून रिव्हर सिटीज अलायन्स महत्त्वाचे आहे.

रिव्हर सिटीज अलायन्सविषयी

  • ही आघाडी तीन व्यापक थीमवर लक्ष केंद्रित करेल : नेटवर्किंग, क्षमता विकास, तांत्रिक सहाय्य
  • याची सुरुवात गंगा नदीच्या खोऱ्यातील शहरांपासून झाली असली तरी खोऱ्याच्या पलीकडील शहरांचाही समावेश करण्याकरिता तिची व्याप्ती केली आहे.

रिव्हर सिटीज अलायन्समधील महाराष्ट्रातील सहभागी शहरे : औरंगाबाद व पुणे

  • राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (NIUA) यांनी आरसीए लॉन्च करण्यासाठी एकत्रितपणे सहकार्य केले आहे.

उद्दिष्टे :

  • शहरी नद्यांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या असलेल्या पैलूंवर चर्चा करण्यासाठी आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सदस्य शहरांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
  • शहरांच्या शहरी नदी व्यवस्थापन योजना तयार करणे आणि शाश्वत शहरी नदी व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या शहर – विशिष्ट क्षेत्रीय धोरणे विकसित करणे.

सूचना :

  • शहरांनी नद्यांच्या पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
  • शहरांचे नियोजन करताना नदी संवेदनशील दृष्टिकोन मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.

संबंधित उपक्रम

१) नमामि गंगे (२०१४) : गंगा नदीचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन या दुहेरी उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी एकात्मिक संरक्षण अभियान

२) गंगा कृती आराखडा (१९८५) : १९८५ मध्ये पर्यावरण मंत्रालयाकडे; उद्देश घरगुती सांडपाणी रोखणे व वळविणे आणि त्यावर पक्रिया करून पाण्याची गुणवत्ता सुधारणे.

३) राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरण (NRGBA) : पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६च्या कलम ३ अंतर्गत २००९ मध्ये स्थापना

४) भूवन-गंगा वेब ॲप : गंगा नदीवरील प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी व जनतेचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी

५) कचरा विल्हेवाटीवर बंदी : २०१७ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने गंगेमध्ये कोणत्याही कचऱ्याची विल्हेवाट करण्यास बंदी घातली आहे.

Contact Us

    Enquire Now